अमरावतीत अश्लील व्हिडिओ कांड, 180 तरुणी आणि 350 'तसले' व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप, वातावरण तापलं

मुंबई तक

Amravati crime : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका अश्लील व्हिडिओमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं चित्र आहे. संबंधित प्रकरण हे मुख्य आरोपी मोहम्मद अयान या MIM पक्षच्या नेत्याशी संबंधित असल्याने वाद आणखी चिघळला आहे. तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात एकच खळबळ माजल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

Amravati crime
Amravati crime
google news

बातम्या हायलाइट

point

'180 तरुणींचे शोषण करून 350 हून अधिक अश्लील व्हिडिओ व्हायरल केले'

point

आरोपीचा संबंध MIM पक्षाशी संबंध असल्याचा भाजप नेत्याचा आरोप 

Amravati Crime : धनंजय साबळे - अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका अश्लील व्हिडिओमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं चित्र आहे. संबंधित प्रकरण हे मुख्य आरोपी मोहम्मद अयान या MIM पक्षच्या नेत्याशी संबंधित असल्याने वाद आणखी चिघळला आहे. तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात एकच खळबळ माजल्याची माहिती आहे. वाढता दबाव पाहता, पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल करत आरोपीच्या मुसक्या आवळल्याचं वृत्त आहे. 

हे ही वाचा : प्रेमसंबंधातून नवऱ्याचे तुकडे, डिझेलनं जाळला मृतदेह अन् जेसीबीने शेतात पुरला, बायकोच्या प्रेमाचा रक्तरंजित थरार

'180 तरुणींचे शोषण करून 350 हून अधिक अश्लील व्हिडिओ व्हायरल केले'

संबंधित प्रकरणात आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या गंभीर प्रकरणात भाजप नेत्याने आरोप केला की, ज्यामध्ये 180 तरुणींचे शोषण करून 350 हून अधिक अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल केले. मात्र, पोलिसांनी 7 पीडितांची ओळख पटल्याच्या माहितीला अधिकृतपणे दुजोरा दिला. 

मोबाईल फोनसह इतर डिजिटल उपकरणे जप्त

परतवाडा ठाणे पोलीस निरीक्षक सुरेश मस्के यांनी माहिती दिली की, पीडितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कोणाचीही औपचारिक तक्रार दाखल केली नाही. पीडितांनी पुढे येऊन आपली ओळख गोपनीय ठेवण्याचे आवाहन केले. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोनसह इतर डिजिटल उपकरणे जप्त केली. प्राथमिक तपासातून असे निष्पन्न झालं की, आरोपीने मोठ्या प्रमाणात डेटा डिलिट केला होता.  हा डेटा मिळवण्यासाठी फॉरेन्सिक पथकाने काम सुरु केले आहे.

आरोपीचा संबंध MIM पक्षाशी संबंध असल्याचा भाजप नेत्याचा आरोप 

दरम्यान, स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केल्याचे दिसून येते. मोठ्या संख्येनं नागरिक पोलीस ठाण्यासमोर जमले होते आणि त्यांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. आंदोलकांनी सांगितलं की, 'कोणाचीही मुलगी किंवा बहीण सुरक्षित नाही, अशा आरोपीला अत्यंत कठोर कारवाई झाली पाहिजे'. या घटनेनं सुरु असलेला राजकीय वाद अधिक तीव्र झाला. आरोपीचा संबंध MIM पक्षाशी संबंध असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. नगरपालिकांच्या निवडणुकीदरम्यान हा आरोपी पक्षाच्या सोशल मीडियाच्या जबाबदार्‍या सांभाळता होता. 

हे वाचलं का?