चिकनमध्ये कंडोम आढळल्याचा जोडप्याचा आरोप, रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह
Viral News : एका हॉटेलमध्ये जोडपं जेवण करताना त्यांच्या ताटातील चिकनमध्ये कंडोमसारखी वस्तू आढळून आली होती. या घटनेनं जोडप्याने संताप व्यक्त करत हॉटेलच्या व्यवस्थापनावर संताप व्यक्त केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जेवणात कंडोमसारखी वस्तू
रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनावर, अस्वच्छता आणि निष्काळजीपणावर प्रश्न
Viral News : ह्यूस्टन फास्ट-फूड चेन रेस्टॉरंट पॉपयेज विरोधात 12,5 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली. एका जोडप्याने आरोप केला की, त्यांनी पॉपयेजच्या एका आउटलेमधून फ्राइड चिकनची मागणी केली होती, परंतु त्यांना त्यातील एका तुकड्यात कंडोमसारखी वस्तू आढळून आली होती. जस्टिन हॉवर्ड आणि डॅनियल मॅकिनन यांनी 3 ऑगस्ट रोजी साउथ सॅम ह्यूस्टन पार्क वेस्ट येथील पॉपयाज आउटलेटमधून चिकन विकत घेतले. हावर्डच्या म्हणण्यांनुसार, चिकनचा एक तुकडा तोडताच त्यात कंडोमसाखी वस्तू दिसून आली होती. ही घटना अमेरिकेतली असल्याचं समजतंय.
हे ही वाचा : डोंबिवलीत डॉक्टरांना मारहाण प्रकरणात शिंदेंच्या नगरसेवकाला जामीन, उच्च न्यायालयाकडून 'त्या' अटी
जेवणात कंडोमसारखी वस्तू
संबंधित घटनेनुसार, जेवणात कंडोमसारखी वस्तू आढळून आल्याने त्यांनी लगेचच जेवण करणं थांबवलं. दोघांना मळमळू लागले होते. खराब झालेले अन्न खाल्ले असावे अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. त्याच्या म्हणण्यांनुसार, संबंधित वस्तू अन्नपदार्थात किती काळ होती, याचा अन्नपदार्थावर परिणाम झाला होता का? हे जाणून घेण्याबाबत त्यांना काहीही ठाऊक नव्हते.
रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनावर, अस्वच्छता आणि निष्काळजीपणाचा प्रश्न
या दाव्यात पोपयेज ही मूळ कंपनी, रेस्टॉरंट ब्रॅड़्स इंटरनॅशनस, पोपयेड लुइझियाना किचन आणि फ्रँचाझी ऑपरेटर अमाना बिझनेस यांनी प्रतिवादी बनवण्यात आले होते. जोडप्याने रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनावर, अस्वच्छता आणि निष्काळजीपणाचा प्रश्न उपस्थित केलेत. जोडपे आपली तक्रार घेऊन रेस्टॉरंटकडे घेऊन गेले. तक्रारीनुसार, पीडित जोडप्यांचे म्हणणं गांभीर्यतेनं घेतले नाही, त्यांची मस्करी केली.
हे ही वाचा : मॉनिटर बदलल्याने शाळेत खून, घटनेचा रक्तरंजित थरार
संबंधित प्रकरणात जोडप्यांनी आरोप केला की, आम्ही दुसऱ्या चिकनची मागणी केली होती. अधिक दबाव देत पैशांची मागणी केल्यानंतर पैसे परत करण्यात आले. नंतर काही आंदोलक संबंधित हॉटेलवर पोहोचले होते. नंतर व्यवस्थापन पथकाला भेटून प्रकरणाची माहिती दिली. तेव्हा त्यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत आउटलेटची विक्री थांबवण्याची मागणी केली होती.
