मॉनिटर बदलल्याने शाळेत खून, घटनेचा रक्तरंजित थरार

मुंबई तक

crime news : शाळेतील मॉनिटरच्या बदलीवरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये संघर्ष पेटला होता. वाद आणि एकमेकांच्या झटापटीनंतर एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत ठार करण्यात आल्याची घटना आहे. या हल्ल्याचा खळबळजनक व्हिडिओ जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

शाळेतील मॉनिटरच्या बदलीवरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये संघर्ष

point

तरुणाची हत्या करत संपवलं

Crime News : शाळेतील मॉनिटरच्या बदलीवरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये संघर्ष पेटला होता. वाद आणि एकमेकांच्या झटापटीनंतर एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत ठार करण्यात आल्याची घटना आहे. या हल्ल्याचा खळबळजनक व्हिडिओ जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आला होता. ज्याने कोणी ते पाहिले, त्यांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा गंभीर प्रकार पंजाबच्या फाजिल्का शाळेतील आहे. या घटनेनं परिसर हादरून गेलाय. 

हे ही वाचा : रुणानं अंघोळीचा व्हिडिओ बनवला, नंतर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग अन्..

पीडित मुलाच्या डोक्यावर विटा आणि दगडांनी हल्ला

संबंधित घटनेच्या व्हिडिओत इतर विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली होती. नंतर पीडित मुलाच्या डोक्यावर विटा आणि दगडांनी हल्ला केला. मुलगा मदतीची मागणी करत होता, मात्र घराबाहेर जमाव गोळा होऊन हिंसक रुप मिळाले. बाहेर असलेले अनेक विद्यार्थी केवळ बघतच राहिले होते, काही जण चित्रीकरण करतात, तर काही जण इतर कामांमध्ये व्यस्त होतात. 

शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेबाबत मोठा प्रश्न ऐरणीवर 

जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयाच दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू ठेवण्यात आले होते. मात्र, हल्ल्यादरम्यान मृत व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या हल्ला केल्याने अतिरक्तस्त्रावामुळे त्याला आपले प्राण वाचवता आले नाहीत. अशातच शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेबाबत मोठा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय. ही घटना घडल्यानंतर पालकांच्या मनामध्ये विद्यार्थ्यांप्रति मोठी चिंता निर्माण झाली. 

हे ही वाचा : जालना हादरलं! भरधाव कार विहिरीत कोसळली, दोन महिलांचा दुर्दैवी अंत

दिल्लीत असाच धक्कादायक प्रकार

गेल्या महिन्यात 20 जुलै रोजी दिल्लीच्या कालगाजी परिसरात इयत्ता 11 वीच्या एका विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करत संपवलं. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली होती. विद्यार्थ्यांमधील वादाने मोठे टोक गाठून चाकूने हल्ला करत संपवले.