जालना हादरलं! भरधाव कार विहिरीत कोसळली, दोन महिलांचा दुर्दैवी अंत

मुंबई तक

Jalna News :  जालनाच्या भोकरदन परिसरात मन सुन्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आलाय. पद्मवती शिवारात एक क्रेटा कारचा भीषण अपघात झाला. कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती कार एका विहिरीत पडली होती. संबंधित कारमध्ये दोन महिला आणि एक पुरूष होते, यापैकी अपघातात दोन महिलांना दुर्दैवी मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

Jalna News
Jalna News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

भरधाव कार विहिरीत कोसळली

point

दोन महिलांचा दुर्दैवी अंत

Jalna News : गौरव साळी - जालनाच्या भोकरदन परिसरात मन सुन्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आलाय. पद्मवती शिवारात एक क्रेटा कारचा भीषण अपघात झाला. कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती कार एका विहिरीत पडली होती. संबंधित कारमध्ये दोन महिला आणि एक पुरूष होते, यापैकी अपघातात दोन महिलांना दुर्दैवी मृत्यू झाला. हे तिघेही नातेवाईकांचे अंतिम संस्कार उरकून घरी परतत होते, यादरम्यान कार चालकाचे नियंत्रण सुटलं आणि होत्याचं नव्हतं होऊन बसलं. 

हे ही वाचा : Astrology : सूर्य आणि केतूचा संयोग, 'या' राशींच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल

भरधाव कार विहिरीत कोसळली

भीषण अपघातात कार रस्त्याच्या किमान 15 मीटर अंतरावर फेकली गेली होती. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी दोन महिलांना विहिरीतून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान, महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुसरीकडे पुरूषावर रुग्णालयात उपचार सुरूच आहे. या घटनेनंतर कार ही पूर्णपणे पाण्यात बुडाली. 

महिलांचा दुर्दैवी मृत्यू

याचदरम्यान वृद्ध महिलेला पाण्यातून बाहेर काढणं अवघड होऊ बसलं होतं. पारध पोलीस आणि स्थानिकांनी बचाव पथकाला घटनास्थळी बोलावून मदत घेतली. तब्बल 12 ते 13 तासांपासून बचाव कार्यानंतर जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने विहिरीतून कारला बाहेर काढण्यास यश मिळाले होते. कारसोबत अडकलेल्या महिलेला बाहेर काढण्यात आलं होतं. मात्र त्या वृद्ध महिलांचा मृत्यू झाला होता. 

हे ही वाचा : भाजपच्या कुठल्या मित्रपक्षाचा पाठिंबा? दिपके हसले, काय बोलून गेले?

कार चालकाचे प्राण वाचले होते, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात स्थानिक तात्काळपणे मदतीला आले. नंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल केले होते. सांगण्यात येतंय की, पाण्यानं भरलेली विहीर होती, पीडितांना बाहेर काढण्यासाठी अथक श्रम घ्यावे लागले होते. रेस्क्यू पथकाला कारपर्यंत पोहोचणं अवघड होऊन बसलं होतं. 12 ते 13 तास अथक प्रयत्नानंतर वृद्ध महिलेला बाहेर काढण्यात आल, मात्र त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं गावात शोक व्यक्त केला जात आहे.