भाजपच्या कुठल्या मित्रपक्षाचा पाठिंबा? दिपके हसले, काय बोलून गेले?

मुंबई तक

या Exclusive मुलाखतीत अभिजित दीपके यांनी आंदोलनानंतरच्या पडद्यामागील घडामोडी, विविध राजकीय पक्षांकडून आलेल्या प्रतिक्रिया, सरकारसोबतचा संवाद, CJP च्या पुढील रणनीती आणि देशभरातील जनआंदोलनाच्या पुढील टप्प्याबाबत सविस्तर भाष्य केलं आहे.

ADVERTISEMENT

Abhijit Dipke Exclusive
Abhijit Dipke Exclusive
Google CTA

बातम्या हायलाइट

point

भाजपच्या कुठल्या मित्रपक्षाचा पाठिंबा?

point

दिपके हसले, काय बोलून गेले?

Abhijit Dipke Exclusive : जंतरमंतरवरील आंदोलन संपल्यानंतरही देशातील आणि महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांचे नेते आंदोलनकर्त्यांच्या सातत्याने संपर्कात असून त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून या लढ्याला पाठिंबा दिला आहे. जे काम राजकीय नेत्यांना आजवर जमले नाही, ते विद्यार्थ्यांच्या व आंदोलकांच्या माध्यमातून शक्य झाल्याची कबुलीही अनेक नेत्यांनी दिली आहे. 'मुंबई तक'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत युवा आंदोलक अभिजित दीपके यांनी ही माहिती दिली असून, सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्वच राजकीय घटकांनी या लढ्याचे कौतुक केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पोलिसांवर वाढता राजकीय दबाव

दिल्ली पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यातील वागणुकीच्या फरकावर बोलताना अभिजित यांनी सांगितले की, दिल्ली पोलीस एखाद्या रोबोटप्रमाणे केवळ वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करतात आणि वयाचा विचार न करता लाठीचार्ज करतात. त्या तुलनेत पुरोगामी विचार आणि संस्कृती लाभलेली महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा अधिक संवेदनशील आहे. मात्र, मुंबईत घडलेल्या एका घटनेत महिला आंदोलकाला झालेली मारहाण आणि पोलिसांची वाढती राजकीय दबावाखालील भूमिका यांमुळे त्यांनी निराशाही व्यक्त केली.

हे ही वाचा : 2023 च्या सुप्रीम कोर्ट निकालात काय होतं, ज्याचा दाखला ठाकरे अजूनही सुप्रीम कोर्टात देतात?

आंदोलकांना झुरळ मानून...

या वेळी सीआयडीच्या कर्मचाऱ्यांकडून आंदोलकांवर ठेवल्या जाणाऱ्या सर्व्हेलन्सचा एक गंभीर प्रकार समोर आणण्यात आला. एका सीआयडी कर्मचाऱ्याच्या व्हॉट्सॲप ग्रुपचे नाव 'हिट स्प्रे' असे असल्याचे उघडकीस आले. घरातील झुरळांचा नायनाट करण्यासाठी ज्याप्रमाणे स्प्रे वापरला जातो, त्याच धर्तीवर आंदोलकांना झुरळ मानून त्यांच्या प्रत्येक हालचालीवर आणि संवादावर बारीक लक्ष ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार कोणाचेही असो, महाराष्ट्राच्या पोलिसांनी आपली राजकीय तटस्थता आणि उज्ज्वल परंपरा जपावी, अशी अपेक्षा अभिजित यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा : भुजबळ, मुंडेंचा उल्लेख, जरांगेंकडून बावनकुळेंना अरेतुरे; जे बोलले ते पाहाच

आंदोलनाची पुढील वाटचाल

आंदोलनाच्या पुढील वाटचालीबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आंदोलनातून कोणताही ब्रेक घेतलेला नसून देशातील विविध सामाजिक आणि शैक्षणिक मुद्द्यांवर सातत्याने आवाज उठवला जाणार आहे. सध्याच्या विषयांव्यतिरिक्त इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारला घेरण्याचे काम चालूच राहील. सप्टेंबर महिन्यापासून पुढील सर्व संघटित आणि सक्रिय उपक्रमांची नव्याने सुरुवात केली जाईल, असा ठाम निर्धार अभिजित दीपके यांनी या मुलाखतीदरम्यान व्यक्त केला.