Astrology : सूर्य आणि केतूचा संयोग, 'या' राशींच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल
Astrology : ग्रहांचा राजा म्हणून ओळखल्या जाणारा सूर्य ग्रह हा 17 ऑगस्ट रोजी स्वत:च्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत आधीपासून छाया ग्रह केतू वास करतोय. याचा काही राशींवर चांगला वाईट परिणाम दिसून येतो.
ADVERTISEMENT

1/5
केंतू सामान्यत: अध्यात्म आणि अलिप्ततेशी संबंधित मानला जातो, जेव्हा तो स्वराशीत सूर्यासोबत युती करतो, तेव्हा तो व्यक्तीमध्ये प्रचंड धैर्य, ऊर्जा आणि नेतृत्वणगुण निर्माण करतो. स्वराशीत उपस्थिती त्याला अनेक पटींनी बलवान बनते. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, 30 दिवस काही राशींवर आशीर्वाद किंवा 'राजयोग' ठरवतील.

2/5
अशातच ग्रहांचा राजा म्हणून ओळखल्या जाणारा सूर्य ग्रह हा 17 ऑगस्ट रोजी स्वत:च्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत आधीपासून छाया ग्रह केतू वास करतोय.

3/5
सिंह
सिंह राशीच्या लोकांवर सर्वात महत्त्वपूर्ण होतो. कारण हा सण तुमच्या राशीतच आहे. याच काळात तुमचा हरवून गेलेला आत्मविश्वास परत येईल, आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. रखडलेल्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे.

4/5
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी मोठा आर्थिक दिलासा घेऊन येतील. तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमचे अडकलेले पैसे पुन्हा मिळू शकतात. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे.

5/5
धनु
या राशीच्या लोकांचे सुप्त भाग्य जागृत होईल. जी कामे तुम्ही महिन्यांपासून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात, ती कामे लवकर पूर्ण होतील. लांब प्रवासाची किंवा परदेश प्रवासाची योजना आखत असाल, तर यश मिळण्याची अधिक शक्यता आहे.
