डोंबिवलीत डॉक्टरांना मारहाण प्रकरणात शिंदेंच्या नगरसेवकाला जामीन, उच्च न्यायालयाकडून 'त्या' अटी
Ramesh Mhatre : डोंबिवलीतील डॉक्टरांना मारहाण प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अखेर जामीन मंजुर झाल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण न्यायालयाच्या न्यायालयीन आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या जामीनावर आता शिक्कामोर्तब झालाय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अखेर जामीन मंजुर
डोंबिवलीतील डॉक्टरांना मारहाण प्रकरणातील आरोपींना अटी शर्थी
Ramesh Mhatre : डोंबिवलीतील डॉक्टरांना मारहाण प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अखेर जामीन मंजुर झाल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण न्यायालयाच्या न्यायालयीन आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या जामीनावर आता शिक्कामोर्तब झालाय. रमेश म्हात्रेला सायंकाळी 4:45 वाजता आधारवाडी तुरुंगातून सोडले आहे.
हे ही वाचा : शिक्षक नवऱ्याने बायकोला पाण्यात बुडवून मारलं, आरोपीनं बनाव रचला पण..
सर्वच अटी-शर्थीनंतर रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
उच्च न्यायालयाकडून लावण्यात आलेल्या सर्वच अटी-शर्थीनंतर रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर झाला. या घटनेनंतर जेल प्रशासनाने आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली. सायंकाळी 4:45 वाजता रमेश म्हात्रे यांना तुरूंगातून बाहेर आणण्यात आले. आज शनिवार असून सुट्टीचा दिवस आहे आणि आजच्याच दिवशी रमेश म्हात्रे यांना जामीन करण्यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रमेश म्हात्रे महाराष्ट्र सोडून राहणार
दरम्यान न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रे यांनी जामीन मंजुर करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर राहावं, अशी अट दिली. अशातच रमेश म्हात्रे हे सध्या गोव्यात राहणार असून स्थानिक पोलिस ठाण्यात त्यांना नेहमी हजेरी दिली जाईल. जामीनानंतर रमेश म्हात्रे यांनी न्यायपालिकेवर विश्वास दाखवला.
हे ही वाचा : मॉनिटर बदलल्याने शाळेत खून, घटनेचा रक्तरंजित थरार
ते म्हणाले की, मला न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास होता, जे प्रकरण न्यायालयात आहे, न्यायपालिका जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे. दरम्यान, डॉक्टरांना मारहाण प्रकरणात पुढील न्यायालयीन प्रक्रियेवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
