शिक्षक नवऱ्याने बायकोला पाण्यात बुडवून मारलं, आरोपीनं बनाव रचला पण..

मुंबई तक

crime news : शिक्षक पतीने आपल्याच पत्नी शिक्षिकेच्या डोक्यावर हल्ला करत तिला पाण्यातील एका टबमध्ये बुडवून मारण्यात आलं.  हत्येनंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी खोटी घटना रचली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला असता, आरोपी नवऱ्याने पत्नी पायऱ्यांवरून पाण्याच्या टबमध्ये पडली आणि तिचा मृत्यू झाला अशी माहिती दिली.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

शिक्षक पतीने पत्नी शिक्षिकेला संपवलं

point

पोलिसांपासून लपवण्यासाठी रचला बनाव

Crime News : शिक्षक पतीने आपल्याच पत्नी शिक्षिकेच्या डोक्यावर हल्ला करत तिला पाण्यातील एका टबमध्ये बुडवून मारण्यात आलं.  हत्येनंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी खोटी घटना रचली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला असता, आरोपी नवऱ्याने पत्नी पायऱ्यांवरून पाण्याच्या टबमध्ये पडली आणि तिचा मृत्यू झाला अशी माहिती दिली. पोलिसांना संशय झाला की, महिला शिक्षिकेची हत्या ही तिचाच नवरा शिक्षकाने केली होती. शवविच्छेदनाच्या आधारे पोलिसांनी मोठी कारवाई केली. ही घटना उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील आहे. 

हे ही वाचा : मॉनिटर बदलल्याने शाळेत खून, घटनेचा रक्तरंजित थरार

महिलेच्या डोक्याला गंभीर इजा

पोलीस प्रकरणातून माहिती समोर आली की, महिलेच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. डोक्यावर हल्ला करण्यात आला होता, रक्ताने माखलेली कपडे आढळून आली होती, यावरून ही हत्या असल्याचा पर्दाफाश समोर आलाय. या घटनेची माहिती मिळताच, कुटुंबीयांचं रडून रडून वाईट हाल झाले होते. मृत शिक्षिकेच्या आईने सांगितलं की, माझ्या राक्षस असलेल्या जावयाने माझ्या मुलीची हत्या केली. 

बायकोच्या मृत्यूचा आरोपी नवऱ्याने रचला बनाव

आरोपी शिक्षिकाची  दिलीप यादव (वय 30) अशी ओळख समोर आलीय. तसेच पत्नी शानिली यादव (वय 28) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेची ओळख आहे, ती एका खाजगी शाळेत शिकवत होती. जेव्हा शालिनीचा मृत्यू झाला असता, तेव्हा आरोपी शिक्षक पती दिलीपने बायकोचा मृत्यू पायऱ्यांवरून पडून झाल्याचं सांगितलं. 2018 मध्ये दोघांचाही विवाह झाला होता. त्यांना आठ वर्षांचा एक मुलगा देखील होता. 

शनिवारी काळी पाच वाजता तो बाहेर फिरण्यासाठी आला होता. शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता पोलिसांचा सूचना मिळाली की, शालिनीचा मृत्यू झाला असता, नवरा दिलीपने पोलिसांना सांगितलं की, सकाळी साडे पाच वाजता फिरायला गेलो होतो, साडे सहा वाजता घरी परतलो असता पत्नी पाण्याच्या टबमध्ये पडली होती. नंतर तिला तात्काळपणे रुग्णालयात नेण्यात आले.