पुणे: आंब्यांचे आमिष दाखवून अडीच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, आई पोहोचताच डोळ्यादेखत... लज्जास्पद प्रकार

मुंबई तक

Pune Crime : पुण्यात लाज आणणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अडीच वर्षाच्या चिमुरडीला आंब्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची लाज आणणारी घटना घडली आहे, या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त समोर आलं. या प्रकरणातील आरोपीला काळेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

ADVERTISEMENT

Pune Crime
Pune Crime
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात लाज आणणारा धक्कादायक प्रकार

point

अडीच वर्षाच्या चिमुरडीला आंब्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार

Pune Crime : कृष्णा पांचाळ - पुण्यात लाज आणणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अडीच वर्षाच्या चिमुरडीला आंब्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची लाज आणणारी घटना घडली आहे, या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त समोर आलं. या प्रकरणातील आरोपीला काळेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीची विजय पोपट भोसले (वय 47) अशी ओळख असून या घटनेनं एकच खळबळ माजली आहे. 

हे ही वाचा : सांगली हादरली, आंतरजातीय लग्न, पण नवऱ्याचे तृतीयपंथीयासोबत संबंध; चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची हत्या

नराधमाने दोन्ही मुलींना बाहेर पाठवलं आणि अडीच वर्षाच्या मुलीवर नको तेच...

घडलेल्या घटनेनुसार, आरोपी विजय भोसले आपल्या कुटुंबासोबत काळेवाडी परिसरात राहतो. तसेच पीडितेचं कुटुंब देखील याच परिसरात राहते. सोमवारी दुपारी पीडिता आपल्या दोन बहिणींसोबत घराजवळ खेळत होती. आरोपीने तीन मुलींना आंबे देतो असं आमिष दाखवून बोलावलं. त्यादरम्यान नराधमाने दोन्ही मुलींना बाहेर पाठवलं आणि अडीच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला.  

हे ही वाचा : गुरु गोचर 2026: गजकेसरी राजयोगाचा 'या' राशींना होणार लाभ, काय सांगतं राशीभविष्य?

मुलीवर अत्याचार अन् आईची घटनास्थळी धाव, डोळ्यादेखत नको तेच... 

दरम्यान, घटनास्थळी आईने धाव घेतली असता, तिला नको तेच पाहावं लागलं आणि आईला मोठा धक्का बसला. पीडितेच्या आईकडून पूर्ण माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी काहीच तासांमध्ये फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तसेच अनेकदा शाळेत अनोळखी व्यक्तींपासून दूर राहण्याचे सल्ले विद्यार्थ्यांना दिले जातात, पण अशा घटनेनं स्वत:चे कसे संरक्षण करावे? हा प्रश्न उपस्थित होतोय. या प्रकरणात पोलिसांनी पुढील तपास सुरु ठेवला आहे. या घटनेनं लहान मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आता समोर आला आहे. 

हे वाचलं का?