अमरावती : 180 मुली, 350 व्हिडीओ असल्याचा दावा, सत्य काय? मोबाईलमधून कोणी डाऊनलोड केले व्हिडीओ?
Amravati video scandal : अमरावतीच्या परतवाडा येथील व्हिडिओ कांड प्रकरणात दुसरी मोठी अटक झाली असून, मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदाराची चौकशी सुरू आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अमरावती : 180 मुली, 350 व्हिडीओ असल्याचा दावा,
सत्य काय? मोबाईलमधून कोणी डाऊनलोड केले व्हिडीओ?
Amravati video scandal , धनंजय साबळे : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे समोर आलेले व्हिडिओ कांड प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर वळण घेत आहे. सुरुवातीला हे प्रकरण केवळ काही व्हायरल क्लिप्सपुरते मर्यादित असल्याचे मानले जात होते, परंतु जसा तपासाचा वेग वाढला, तशा या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दुसरी मोठी कारवाई करत उजेर खान इकबाल खान याला अटक केली आहे. 180 मुली, 350 व्हिडीओ असल्याचा दावाही या प्रकरणात करण्यात येतोय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उजेर खानने मुख्य आरोपी अयान अहमद याच्या मोबाईलमधून व्हिडिओ डाऊनलोड केले आणि ते सोशल मीडियावर प्रसारित केले होते. सध्या उजेर खानला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली जात असून, त्याला न्यायालयात हजर केले जात आहे. पोलीस कोठडी दरम्यान त्याच्याकडून या कृत्यात आणखी कोणाचे हात आहेत आणि हे व्हिडिओ नेमके कुठे तयार करण्यात आले, याची महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा : मित्राच्या बायकोवर प्रेम केल्याची शिक्षा.., गोड बोलून दारु पाजली आणि जीवंत जाळले
मुख्य आरोपीची कोठडी आणि पीडितांची ओळख
या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याला पोलिसांनी यापूर्वीच बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, न्यायालयाने त्याला 21 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी अयानच्या मोबाईलमधून अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केले असून, त्यातील पीडित मुलींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 8 पीडितांची ओळख पटली असून इतरांचा शोध सुरू आहे. या तपासाचे गांभीर्य लक्षात घेऊन पीडितांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जात आहे. महिला पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे जेणेकरून पीडिता कोणत्याही दबावाशिवाय आपली बाजू मांडू शकतील. विशेष म्हणजे, काही डेटा डिलीट करण्यात आला होता, जो रिकव्हर करण्यासाठी सायबर टीम प्रयत्न करत आहे, ज्यातून मोठे खुलासे होण्याची अपेक्षा आहे.









