घराबाहेर तरुण खाटेवर झोपला, सकाळी उठताच मुंडकं धडापासून वेगळं

मुंबई तक

crime news : तरुण घराबाहेर खाटेवर झोपला होता. मात्र, सकाळी उठताच त्याचे मुंडके शरीरापासून वेगळे झाले होते. सकाळी उठून ग्रामस्थांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गाव हादरून गेले होते.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

घराबाहेरील खाटेवर झोपलेला तरुण

point

सकाळ होताच मुंडकं शरीरापासून वेगळं

Crime News : कर्नाटकात विजयपुरा जिल्ह्यात तरुण घराबाहेर खाटेवर झोपला होता. मात्र, सकाळी उठताच त्याचे मुंडके शरीरापासून वेगळे झाले होते. सकाळी उठून ग्रामस्थांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गाव हादरून गेले होते. गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मृत तरुणाची इसाक बागवान (वय 25) अशी ओळख समोर आली होती.

हे ही वाचा : नागपूर: मुलगी ऑनलाईन गेमच्या जाळ्यात, उत्तर प्रदेशात नेऊन लैंगिक अत्याचार

घराबाहेरील खाटेवर झोपलेल्या तरुणाचे डोके शरीरापासून झाले वेगळे 

घटनेच्या प्राथमिक माहितीनुसार, इसाक बागवान हा घराबाहेरील खाटेवर गाढं झोपी गेला होता. रात्री काही हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात इसाकची हत्या करण्यात आली. हल्ला इतका भीषण होता की, तरुणीचे डोके हे शरीरापासून वेगळे झाले होते. सकाळी ग्रामस्थांनी तिचा मृतदेह पाहिला आणि या घटनेची गावात चर्चा झाली. 

या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. नंतर प्रकरण जाणून घेतले आणि तपास केला होता. नंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून प्रकरणाचा पुढील तपास केला असता, यामागील नेमके कारण अद्यापही समोर आलेले नाही. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू ठेवला आणि आरोपींची ओळख समजून घेत त्यांची चौकशी केली. 

हे ही वाचा : लातूर: 18 वर्षीय तरुणांचा दुचाकीवरून अपघात, दोघांचा दुर्दैवी मृत्यू; घातपाताचा संशय

या प्रकरणाचा लवकरच खुलासा करण्याचा प्रयत्न केला जाईल. ग्रामस्थांचा दावा असाय की, या क्रूर कृत्याने परिसरात गावातच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तपास जसा पुढे जाईल तसा हत्येमागील खुलासा होईल, असा पोलिसांनी विश्वास व्यक्त केला.