सोशल मीडिया स्टार महेश मोटेने राज ठाकरेंची माफी का मागितली?

मुंबई तक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या रीलस्टार महेश मोटेने मनसे कार्यालयात जाऊन माफी मागितली. महेश मोटेने राज ठाकरे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

ADVERTISEMENT

mahesh mote raj thackeray apology
mahesh mote raj thackeray apology
Google CTA

बातम्या हायलाइट

point

सोशल मीडिया स्टार महेश मोटेने राज ठाकरेंची माफी का मागितली?

कंटेंट क्रिएटर आणि रील स्टार महेश मोटे याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे रील शेअर केल्यानंतर राज ठाकरेंची माफी मागितली आहे. महेश मोटे मनसेच्या पुण्यातील हडपसर येथील कार्यालयात गेला होता. काही दिवसांपूर्वी त्याने राज ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे रील शेअर केले होते. या रीलमध्ये आक्षेपार्ह आणि अश्लील भाषा वापरण्यात आल्याने पुण्यातील मनसैनिक आक्रमक झाले होते.

महेश मोटेने स्वतःच्या तोंडाला काळे फासले

महेश मोटे हा केरळला फिरण्यासाठी गेल्याने मनसैनिक त्याच्या पुण्यात परतण्याची वाट पाहत होते. पुण्यात आल्यानंतर मनसैनिकांनी त्याचा शोध घेतला. त्यानंतर महेश मोटे स्वतः मनसेच्या हडपसर येथील कार्यालयात पोहोचला. यावेळी मनसैनिकांनी त्याला केलेल्या विधानाबाबत जाब विचारला. त्यानंतर महेश मोटेने स्वतःच्या तोंडाला काळे फासले. तसेच त्याने राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या स्थानिक नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची माफी मागितली.

माफी मागताना राज ठाकरे यांच्याबद्दल चुकीचे बोलल्याचे मान्य केले

महेश मोटेने आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागताना राज ठाकरे यांच्याबद्दल चुकीचे बोलल्याचे मान्य केले. तसेच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याबद्दलही चुकीचे बोलल्याचे त्याने म्हटले. या प्रकरणामुळे आपल्याला आपल्या चुकीचे प्रायश्चित्त होत असल्याचे महेश मोटेने सांगितले. नगरसेवक साईनाथ बाबर, आशिष साबळे, तपकीर साहेब, शुभम दादा यांच्यासह मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांचीही त्याने माफी मागितली. यावेळी त्याने पुन्हा अशा प्रकारच्या वादात पडू नये, असेही म्हटले.

महेश मोटे हा सोशल मीडियावरील प्रसिद्ध रील स्टार असून त्याचे मोठ्या संख्येने फॉलोवर्स आहेत. वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तो अनेकदा प्रतिक्रिया देत असतो. यापूर्वीही त्याने अनेक वादग्रस्त विधान करणाऱ्या रील शेअर केल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर आणि त्यानंतर दिलेल्या माफीनाम्यामुळे महेश मोटे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.