मुंबईची खबर : लवकरच सुरु होणार नवी मेट्रो लाईन, 'या' भागातील प्रवाशांची होणार ट्राफिकमधून सुटका; जाणून घ्या सविस्तर
मुंबईतील मेट्रोचे जाळे विस्तारत असतानाच मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी दोन मेट्रो मार्गिका सुरु झाल्यानंतर आता अजून एक मेट्रो मार्गिका लवकरच सुरु होणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईची खबर : लवकरच सुरु होणार नवी मेट्रो लाईन
'या' भागातील प्रवाशांची होणार ट्राफिकमधून सुटका
जाणून घ्या सविस्तर
Mumbai News : मुंबईतील मेट्रोचे जाळे विस्तारत असतानाच मुंबई आणि ठाणेकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या वडाळा ते कासारवडवली या मेट्रो मार्गिकेच्या कामातील सर्वात मोठा अडथळा आता दूर झाला आहे. विक्रोळी येथील लक्ष्मीनगर स्थानकाच्या जमिनीवरून सुरू असलेला खासगी कंपनीचा वाद संपुष्टात आल्याने या मार्गिकेच्या कामाला आता मोठी गती मिळणार आहे. यामुळे रखडलेल्या स्थानकाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
जमिनीचा वाद मिटला
सुमारे 32 किमी लांबीची ही मेट्रो मार्गिका संपूर्णपणे उन्नत (Elevated) स्वरूपाची असून त्यावर एकूण 30 स्थानके असणार आहेत. आतापर्यंत या प्रकल्पाचे जवळपास 84 टक्के काम पूर्ण झाले आहे. लक्ष्मीनगर येथील जमिनीचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याने या स्थानकाचे काम थांबले होते, ज्याचा परिणाम संपूर्ण प्रकल्पाच्या वेळेवर होत होता. मात्र, आता हा तांत्रिक आणि कायदेशीर तिढा सुटल्यामुळे उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.
हे ही वाचा : TCS Scandal: देशाला हादरवून टाकणारे खुलासे, नाशिकमधील अंडरकव्हर ऑपरेशन... महिलांसोबत नेमकं घडलं तरी काय?
कधी खुला होणार प्रकल्प?
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही मेट्रो मार्गिका 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे. मार्गिकेच्या काही विशिष्ट अंतरावर यशस्वी चाचण्या देखील पार पडल्या आहेत. सध्या मुंबई ते ठाणे दरम्यान रस्ते मार्गाने प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, मात्र ही मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवासाचा हा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
हे ही वाचा : सूर्याचा मेष राशीत प्रवेश, 'या' राशींच्या लोकांना जे हवं ते मिळणार; तुमच्या राशीत काय?
वाहतूक कोंडीतून दिलासा
वडाळा ते कासारवडवली मेट्रोमुळे मुंबई आणि ठाणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ तब्बल 50 ते 75 टक्क्यांनी कमी होणार आहे. यामुळे केवळ वेळेची बचतच होणार नाही, तर रस्त्यांवरील खासगी वाहनांची संख्या कमी होऊन वाहतूक कोंडीतून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने ही मेट्रो मार्गिका मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.









