सूर्याचा मेष राशीत प्रवेश, 'या' राशींच्या लोकांना जे हवं ते मिळणार; तुमच्या राशीत काय?

मुंबई तक

सौर नववर्ष म्हणजे जेव्हा सूर्य एक राशीचक्र पूर्ण करून पुन्हा मेष राशीत प्रवेश करतो. ज्योतिषशास्त्रात मेष राशीला आरंभाचे प्रतीक मानले जाते, म्हणून याला नवीन वर्षाची सुरुवात म्हटले जाते.

ADVERTISEMENT

solar new year 2026
solar new year 2026
google news

बातम्या हायलाइट

point

सूर्याचा मेष राशीत प्रवेश

point

'या' राशींच्या लोकांना जे हवं ते मिळणार

point

तुमच्या राशीत काय?

Solar New Year 2026 : 14 एप्रिलपासून सौर नववर्षाची (सोलर नववर्ष) सुरुवात झाली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, दरवर्षी जेव्हा सूर्य मेष राशीत प्रवेश करतो, तेव्हाच सौर नववर्षाची सुरुवात होते. हा दिवस नवीन ऊर्जा, नवी सुरुवात आणि जीवनातील सकारात्मक बदलांचे संकेत देतो. भारताच्या अनेक भागांत हे सण वेगवेगळ्या नावांनी साजरे केले जातात. ज्योतिष्यांच्या मते, या दिवशी सूर्याची स्थिती सर्व राशींवर खोलवर परिणाम करते, ज्यावरून संपूर्ण वर्षाचे संकेत मिळतात. चला जाणून घेऊया, सौर नववर्ष कोणत्या राशींसाठी शुभ मानले जात आहे.

'या' राशींसाठी ठरणार शुभ

मेष : या सौर नववर्षात मेष राशीच्या लोकांसाठी काळ अत्यंत अनुकूल राहणार आहे. सूर्य तुमच्याच राशीत मजबूत स्थितीत असल्याने तुमचा आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण वाढतील. करिअरमध्ये तुम्हाला उत्तम संधी मिळू शकतात. काही लोकांना हवी तशी नोकरीही मिळू शकेल. नशिबाची साथ मिळाल्याने तुमची अनेक अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात आणि इच्छा पूर्ण होऊ शकतात.

मिथुन : मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ नवीन संधींनी भरलेला असेल. गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या अडचणी हळूहळू संपू शकतात. नशिबाची साथ मिळाल्याने अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक बाबतीतही स्थिती चांगली राहील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. हा काळ दिलासा आणि प्रगती देणारा ठरेल.

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यावर उष्णतेचं संकट, 'या' जिल्ह्यांतील नागरिकांचं अगं भिजणार घामानं, IMD अलर्ट

सिंह : सौर नववर्षाची सुरुवात सिंह राशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम घेऊन येऊ शकते. तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. नशीबही तुमच्या बाजूने असेल. जे लोक परदेशाशी संबंधित कामे करतात, त्यांना लाभ मिळू शकतो. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यश मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

हे वाचलं का?