रस्ते अपघाताने मृत्यू...पण 3 महिन्यांनी मृतदेह काढला बाहेर, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

belagavi crime news : माजी सैनिक संदीप मंजारी यांच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. 2 कोटी रुपयांच्या विम्यासाठी पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराने हत्या केल्याचा आरोप असून फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे.

ADVERTISEMENT

belagavi crime news
belagavi crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

रस्ते अपघाताने मृत्यू...

point

पण 3 महिन्यांनी मृतदेह काढला बाहेर, नेमकं काय घडलं?

belagavi crime news : कर्नाटकातील बेलगावमध्ये माजी सैनिक संदीप मंजारी यांच्या मृत्यूचे गूढ तीन महिन्यांनंतर पुन्हा समोर आले आहे. 45 वर्षीय संदीप मंजारी हे हुक्केरी तालुक्यातील घोडगेरी गावचे रहिवासी होते. याच वर्षी मंदिराच्या जत्रेतून परतत असताना त्यांचा रस्ते अपघात झाला होता. अपघातानंतर जखमी अवस्थेत त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले आणि हे प्रकरण अपघाती मृत्यू म्हणून संपल्याचे मानले गेले. मात्र काही काळानंतर संदीप यांच्या नातेवाईकांनी पोलिसांसमोर गंभीर आरोप केले. त्यामुळे तीन महिन्यांनंतर पोलिसांना मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया करावी लागली.

हेही वाचा : राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या खेळाडूला ताटकळत ठेवल्याची चर्चा, आता राज ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण

ग्लुकोजच्या बाटलीतून संदीप यांना विष देण्यात आल्याचा आरोप

संदीप यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, त्यांची पत्नी सुमा मंजारी आणि तिचा कथित प्रियकर पुंडलिक डोंबर यांनी मिळून संदीप यांच्या हत्येचा कट रचला. रुग्णालयात उपचार सुरू असताना ग्लुकोजच्या बाटलीतून संदीप यांना विष देण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे अपघातातून वाचल्यानंतरही उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या आरोपांनंतर पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरू केला. दरम्यान, पुंडलिक डोंबरचा एक सेल्फी व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये त्याने अनेक गंभीर दावे केले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार, सुमा हिने संदीप यांच्या सुमारे 2 कोटी रुपयांच्या विमा पॉलिसीचा उल्लेख केला होता. विम्याची रक्कम मिळाल्यानंतर दोघेही बेलगावमध्ये नवीन आयुष्य सुरू करण्याचा विचार करत असल्याचा दावाही त्याने केला.

या सेल्फी व्हिडिओमध्ये पुंडलिकने आणखी एक दावा केला आहे. संदीप यांच्या मृत्यूपूर्वी त्यांना कीटकनाशक आणण्यास सांगण्यात आले होते, असे त्याने म्हटले आहे. कुटुंबीयांची तक्रार आणि समोर आलेल्या आरोपांनंतर पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेत संदीप यांचा मृतदेह सुमारे तीन महिन्यांनंतर कबरीतून बाहेर काढला. बेलगावचे सहायक आयुक्त श्रवण कुमार यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया करण्यात आली. मृतदेहाचे नमुने घेण्यात आले असून ते पुन्हा तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी अर्थात FSL कडे पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी संदीप यांची पत्नी सुमा मंजारी आणि कथित प्रियकर पुंडलिक डोंबर यांची चौकशी केली आहे. यमकनमरडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे.