तीन महिन्यांपूर्वी विवाह, बायको मोबाईल देईना म्हणून संशय आला अन् व्हायचं तेच झालं
Crime News : लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांत महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी फरार पतीला अटक केली असून चौकशीत त्याने हत्येमागील कारणांबाबत दावे केले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तीन महिन्यांपूर्वी विवाह
बायको मोबाईल देईना म्हणून संशय आला अन्...
Crime News : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे लग्न झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत एका महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ताजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगला पैमा परिसरातील बंद घरातून मंगळवारी सकाळी उजमा हिचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणात फरार असलेल्या तिचा पती फरहान याला पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा : चंद्रपुरात पुरूषानं घेतला तंत्र मंत्राचा आधार, महिलेला शेजारच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडलं
मोबाईल फोन पाहू देत नसल्याने वाद अन् थेट हत्या
चौकशीदरम्यान फरहानने हत्येमागील कारणांबाबत अनेक दावे केले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार, पत्नी त्याला तिचा मोबाईल फोन पाहू देत नव्हती आणि याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरून हत्येसाठी वापरण्यात आलेले ब्लेडही जप्त केले आहे.
हेही वाचा : आईच्या हत्येचं गुपित लपवण्यासाठी 6 वर्षांच्या मुलाचीही हत्या; 10 दिवसांनी झाला उलगडा
