आईच्या हत्येचं गुपित लपवण्यासाठी 6 वर्षांच्या मुलाचीही हत्या; 10 दिवसांनी झाला उलगडा

मुंबई तक

muzaffarpur mother son double murder case : मुजफ्फरपूरमधील आई आणि मुलाच्या दुहेरी हत्येचा पोलिसांनी उलगडा केला असून प्रेमसंबंधातील वादातून ही घटना घडल्याचा दावा केला आहे. मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या सांगण्यावरून सहा वर्षीय मुलाचा मृतदेहही जप्त करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

muzaffarpur mother son double murder case
muzaffarpur mother son double murder case
Google CTA

बातम्या हायलाइट

point

आईच्या हत्येचं गुपित लपवण्यासाठी 6 वर्षांच्या मुलाचीही हत्या

point

10 दिवसांनी उघड झाले थरारक सत्य

muzaffarpur mother son double murder case  :  मुजफ्फरपूरमधील कांटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या आई आणि सहा वर्षांच्या मुलाच्या दुहेरी हत्येच्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या हत्येमागे प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद हे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी विकास पासवान याला अटक करण्यात आली असून, त्याच्या सांगण्यावरून सहा वर्षीय आर्यन कुमारचा मृतदेहही ताब्यात घेण्यात आला आहे. 

हेही वाचा : Astrology : बुधाचा कर्क राशीत प्रवेश, ऑगस्ट महिन्यात 'या' राशींचं नशीब चमकणार

मुलामुळे आईच्या हत्येचं गुपित उलगडण्याची भीती, त्यालाही संपवलं 

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 23 जुलै रोजी विकास पासवान याने मंजू देवी यांना बागेत बोलावले होते. तेथे दोघांमध्ये त्यांच्या संबंधांवरून वाद झाला आणि त्यानंतर आरोपीने मंजू देवी यांची हत्या केल्याचा आरोप आहे. त्या वेळी त्यांचा सहा वर्षांचा मुलगा आर्यनही घटनास्थळी उपस्थित होता. या घटनेचे सत्य बाहेर येईल या भीतीने आरोपीने आर्यनचीही हत्या केल्याचा पोलिसांचा दावा आहे.\

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात 'या' जिल्ह्यांना मान्सून झोडपणार, IMD चा अलर्ट