प्रियकराच्या प्रेमात वेडी झाली, पोटच्या लेकराची केली हत्या, अपघाचा बनाव रचला

मुंबई तक

Crime News : भिंडमधील सहा वर्षीय सृष्टी दौहरेच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. मेडिकल बोर्डाच्या अहवालानंतर पोलिसांनी तिच्या आईसह कथित प्रियकराविरोधात हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

प्रियकराच्या प्रेमात वेडी झाली

point

पोटच्या लेकराची केली हत्या, अपघाचा बनाव रचला

Crime News : भिंड जिल्ह्यातील सहा वर्षीय सृष्टी दौहरेच्या मृत्यू प्रकरणाला आता अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी वळण मिळाले आहे. सुमारे 45 दिवसांपूर्वी विहिरीत सृष्टीचा मृतदेह आढळल्यानंतर सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, भोपाल मेडिकल बोर्डाच्या अहवालानंतर या प्रकरणामागे हत्येचा संशय असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अहवालाच्या आधारे पोलिसांनी सृष्टीची आई ज्योती दौहरे आणि तिचा कथित प्रियकर रमाशंकर शर्मा यांच्याविरोधात हत्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तपासात दोघांना लग्न करायचे होते आणि सृष्टी त्यांच्या नात्यात अडथळा ठरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या खुलाशानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : लग्न होत नाही म्हणून आईनं पोटच्या लेकीला संपवलं, धाकटी बहीण होती सामील

चिमुकलीचा मृतदेह विहिरीत आढळला होता

लहार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेहरी गावात 15 जून 2026 रोजी सहा वर्षीय सृष्टी दौहरेचा मृतदेह विहिरीत आढळला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामीणांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. सृष्टीची ओळख तिचे वडील धर्मसिंह दौहरे यांनी पटवून दिली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी पॅनेलमार्फत शवविच्छेदन करून सविस्तर अहवालासाठी तो भोपाल मेडिकल बोर्डाकडे पाठवला होता. सुमारे ४५ दिवसांनी प्राप्त झालेल्या मेडिकल बोर्डाच्या अहवालात सृष्टीच्या शरीरावर गंभीर दुखापतींच्या खुणा असल्याचे नमूद करण्यात आले. या निष्कर्षानंतर पोलिसांनी हा अपघात नसून हत्या असल्याचा गुन्हा नोंदवला.

हेही वाचा : लग्न होत नाही म्हणून आईनं पोटच्या लेकीला संपवलं, धाकटी बहीण होती सामील