सांगली हादरली, आंतरजातीय लग्न, पण नवऱ्याचे तृतीयपंथीयासोबत संबंध; चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची हत्या

मुंबई तक

Sangli Crime News : सांगलीच्या विट्यात चारित्र्याचा संशय आणि पतीच्या तृतीयपंथीयांशी असलेल्या संबंधांच्या वादातून 20 वर्षीय पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Sangli Crime News
Sangli Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

सांगली हादरली, आंतरजातीय लग्न, पण नवऱ्याचे तृतीयपंथीयासोबत संबंध;

point

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची हत्या

Sangli Crime News : सांगली जिल्ह्यातील विटा शहरात एका आंतरजातीय विवाहाचा शेवट अत्यंत भयानक पद्धतीने झाला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन अविनाश तुकाराम लोटके याने आपली 20 वर्षीय पत्नी श्रद्धा लोटके हिची निर्घृण हत्या केली आहे. प्रेमविवाह केलेल्या या जोडप्याच्या संसारात गेल्या काही काळापासून दुरावा निर्माण झाला होता. विशेष म्हणजे अविनाशचे तृतीयपंथीयासोबत अनैतिक संबंध होते. या संबंधाला पत्नी विरोध करत असल्याने तो चांगलाच संतापला होता. 

विट्यातील सुतारकी मळा परिसरातील सुनील मारुती गाडे यांच्या भाड्याच्या घरात वास्तव्यास असलेल्या या कुटुंबात मंगळवारी मध्यरात्रीनंतर रक्ताचा सडा पडला. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण विटा शहर आणि तालुका हादरून गेला असून पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.

वादातून हत्येचा थरार आणि आरोपीचे पलायन

अधिकची माहिती अशी की, या घटनेच्या रात्री अविनाश आणि श्रद्धा आपल्या लहान मुलासह विट्याच्या यात्रेत फिरायला गेले होते. तिथून मध्यरात्री घरी परतल्यानंतर दोघांमध्ये किरकोळ कारणावरून जोरदार वादावादी सुरू झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, पहाटे 4 च्या सुमारास अविनाशने रागाच्या भरात घरातील लोखंडी रॉड उचलून श्रद्धाच्या चेहऱ्यावर, कपाळावर आणि डोक्यावर वर्मी घाव घातले. या भीषण हल्ल्यात श्रद्धाचा जागीच मृत्यू झाला. या निर्घृण कृत्यानंतर आरोपीने अत्यंत थंड डोक्याने आपल्या लहान मुलाला एका मित्राकडे नेऊन सोडले आणि काहीतरी खोटे कारण सांगून तिथून पलायन केले. ही घटना सकाळी 8 च्या सुमारास उघडकीस आली, जेव्हा श्रद्धाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला.

हेही वाचा : अमरावती : 180 मुली, 350 व्हिडीओ असल्याचा दावा, सत्य काय? मोबाईलमधून कोणी डाऊनलोड केले व्हिडीओ?

हे वाचलं का?