मुंबईची खबर : CNG चा दर पुन्हा वाढला, आता मोजावे लागणार 'इतके' रुपये
मुंबई मेट्रोपॉलिटन रीजनमध्ये (MMR) प्रवास करणाऱ्या आणि सीएनजी (CNG)चा वापर करणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी आणि चिंताजनक बातमी आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईची खबर : CNG चा दर पुन्हा एकदा वाढला
आता मोजावे लागणार 'इतके' रुपये
Mumbai News : मुंबई मेट्रोपॉलिटन रीजनमध्ये (MMR) प्रवास करणाऱ्या आणि सीएनजी (CNG)चा वापर करणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी आणि चिंताजनक बातमी आहे. गॅस वितरण कंपनी 'महानगर गॅस लिमिटेड'ने (MGL) सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ केली आहे. ऐन महागाईच्या काळात झालेल्या या दरवाढीमुळे वाहनचालक आणि सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे.
इतक्या किंमतीत मिळणार CNG
या ताज्या दरवाढीनंतर आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि एमएमआरच्या इतर सर्व प्रमुख भागांमध्ये सीएनजीची किंमत प्रति किलो 86 रुपये होणार आहे. अचानक झालेल्या या वाढीमुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरातील रिक्षा, टॅक्सी आणि खाजगी सीएनजी कार चालकांचे बजेट कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हे ही वाचा : समजून घ्याः बांगलादेशी भारतात घुसतात कसे? पाहा कोणी केला भांडाफोड
याआधीही झाली होती वाढ
विशेष म्हणजे, गेल्या काही आठवड्यांमधील ही दुसरी मोठी दरवाढ ठरली आहे. यापूर्वी महानगर गॅस लिमिटेडने अवघ्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच 14 मे रोजी सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ केली होती. लागोपाठ झालेल्या या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढणार असून, याचा थेट परिणाम येत्या काळात रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीवर तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूक खर्चावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे ही वाचा : पुण्यात फक्त दारूमुळे 14 जणांचा जीव नाही गेला... 'तो' पदार्थ ठरला काळ, नेमका आहे तरी काय?
मध्य पूर्वेतील युद्धाचा फटका
मध्य-पूर्वेत सुरु असलेल्या अमेरिका-इराण युद्धामुळे इंधनांच्या किमतींमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. जागतिक तेल आणि एलएनजी पुरवठ्यापैकी सुमारे 20% पुरवठ्याचा मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी जहाज वाहतूक विस्कळीत राहिली आहे. येत्या काळात या दरांमध्ये अजून वाढ होणार का ते बघावं लागेल.









