Govt Jobs : इंजिनिअर्स लक्ष द्या, शास्त्रज्ञ म्हणून काम करायचंय? तर मग DRDO मध्ये अर्ज कराच!

मुंबई तक

अनुभवी इंजिनिअर्ससाठी DRDO मध्ये कामाची सुवर्णसंधी आहे. शास्त्रज्ञ या पदासाठी एक लाखांहून अधिक रुपये पगार दिला जाणार आहे.

ADVERTISEMENT

DRDO Jobs
DRDO Jobs
google news

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : अनुभवी इंजिनिअर्सना DRDO मध्ये कामाची सुवर्णसंधी

point

एक लाखांहून अधिक पगार

DRDO Jobs : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये (DRDO) शास्त्रज्ञ 'ई', 'डी' आणि 'सी' या पदांसाठी एकूण 33 रिक्त जागा भरण्यात येत आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास सेवा (DRDS) कॅडरमधील ही एक सुवर्णसंधी असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती नियमित सरकारी नोकरीच्या स्वरूपातील असून, देशाच्या संरक्षण क्षेत्रात योगदान देण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे.

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर उमेदवाराकडे संबंधित विषयात प्रथम श्रेणीतील बी.ई./बी.टेक (B.E./B.Tech), एम.एससी (M.Sc), एम.फार्मसी (M.Pharmacy), किंवा एमबीबीएस/एमडी (MBBS/MD) किंवा त्यासमक्ष पदवी असणे अनिवार्य आहे. यासोबतच पदाच्या श्रेणीनुसार उमेदवाराला 3 ते 11 वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेत निवडक उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार आकर्षक वेतनश्रेणी दिली जाईल, ज्यामध्ये शास्त्रज्ञ 'सी' पदासाठी मूळ वेतन 67,700 रुपयांपासून तर शास्त्रज्ञ 'ई' पदासाठी 1,23,100 रुपयांपर्यंत असणार आहे.

हे ही वाचा : बार्शी : खेळपट्टी सपाट करण्यासाठी रोलर फिरवू लागले, 14 वर्षीय मुलगा खाली पडला अन्...

'अशी' होणार निवड

उमेदवारांची निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि तीन टप्प्यांत पार पडणार आहे. यामध्ये सर्वप्रथम 'प्रशासकीय स्क्रिनिंग' (Administrative Screening) केली जाईल, त्यानंतर 'तांत्रिक स्क्रिनिंग' (Technical Screening) होईल आणि या दोन्ही टप्प्यांतून पात्र ठरलेल्या उमेदवारांना 'वैयक्तिक मुलाखतीसाठी' (Personal Interview) बोलावले जाईल. अंतिम निवडीसाठी उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीत किमान 75% गुण मिळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. अर्जाचे शुल्क 100 रुपये आहे.

हे ही वाचा : Personal Finance: Term Insurance घेताना 'या' 5 चुका टाळा; अन्यथा...

'असा' करा अर्ज

या भरतीसाठी केवळ आरएसीच्या (RAC) अधिकृत भरती पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 जून असून, या दिवशी दुपारी 4: 00 वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारले जातील. त्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी rac.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
 

हे वाचलं का?