सांगली : रुग्णालयाचं ड्रेनेज तुंबल्याने सफाई, पण भयंकर दृश्य दिसलं अन् सगळे हादरले

मुंबई तक

Sangli Crime News : सांगली जिल्ह्यातील मिरजेत महापालिकेच्या प्रसूतीगृहाजवळील ड्रेनेज चेंबरमध्ये मृत अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट पसरली असून पोलीस तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT

Sangli Crime News
Sangli Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

सांगली : रुग्णालयाचं ड्रेनेज तुंबल्याने सफाई

point

पण भयंकर दृश्य दिसलं अन् सगळे हादरले

Sangli Crime News : सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मिरज मार्केट परिसरातील महापालिका रुग्णालय आणि प्रसुतीगृहाच्या नजीक असलेल्या ड्रेनेज चेंबरमध्ये मृत अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हे पुरुष जातीचे अर्भक असून, त्याच्या शरीराला नाळ अजूनही जोडलेली होती. या घटनेमुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, हे क्रूर कृत्य नेमके कोणी केले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृत अर्भकाचा देह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा : 'पेट्रोल थेट 70-80 रुपयात मिळेल', कधी काळी फडणवीसांना बजेट समजवणाऱ्या नेत्याने आता सांगितलं स्वस्त पेट्रोलचं गणित!

प्रसुतीगृहाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

ही घटना प्रसूतीगृहाच्या अगदी जवळ घडल्यामुळे या प्रकरणाकडे संशयाने पाहिले जात आहे. विशेष म्हणजे, संबंधित प्रसुतीगृहामध्ये 23 तारखेपासून कोणतीही प्रसूती झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे हे अर्भक नेमके कुठून आले आणि कोठून आणून ड्रेनेजमध्ये टाकले गेले, हा तपासाचा महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. एखादे अर्भक जन्मानंतर मृत झाले असावे आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याची योग्य विल्हेवाट न लावता थेट ड्रेनेज चेंबरमध्ये फेकून दिले असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. जर हे अर्भक रुग्णालयातील असेल, तर या गंभीर हलगर्जीपणाबद्दल दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. पोलीस आता रुग्णालयातील रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.

हेही वाचा : Personal Finance: 50 हजार पगार असणाऱ्यांसाठी कार घेताना ‘एवढाच’ ठेवावा EMI, नाहीतर…

हे वाचलं का?