बार्शी : खेळपट्टी सपाट करण्यासाठी रोलर फिरवू लागले, 14 वर्षीय मुलगा खाली पडला अन्...
Barshi News : क्रिकेटच्या मैदानावरील खेळपट्टी सपाट करत असताना एक दगडी रोलर फिरवण्यात येत होता. मात्र, या रोलरखाली 14 वर्षांचा मुलगा पडला आणि चिरडल्या गेल्याने त्याचा मृत्यू झालाय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बार्शी : खेळपट्टी सपाट करण्यासाठी रोलर फिरवू लागले,
14 वर्षीय खाली पडला अन्...
Barshi News : सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी येथे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये क्रिकेटचे धडे घेण्यासाठी उत्साहाने समर कॅम्पला जाणाऱ्या 14 वर्षीय मुलाचा जीव गेलाय. क्रिकेट पिच रोलिंग करणाऱ्या जड दगडी रोलरखाली आल्याने मुलाचा चिरडून मृत्यू झालाय. ही हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी (दि.30) बार्शी शहरातील शिवशक्ती मैदानावर घडली. वीरेन योगीराज चौधरी (वय 14, रा. सुभाष नगर, बार्शी) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण बार्शी शहरात शोककळा पसरली असून क्रीडा क्षेत्रासह नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे.
हेही वाचा : पुणे : लग्नाच्या वाढदिवशी गावठी दारू प्यायले, दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू
जड दगडी रोलर काही अल्पवयीन मुले चालवत होती
मिळालेल्या माहितीनुसार, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवशक्ती मैदानावर गेल्या दीड महिन्यांपासून क्रिकेट समर कॅम्प सुरू होता. शनिवारी या कॅम्पचा शेवटचा दिवस होता. सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास मैदानावरील क्रिकेट खेळपट्टी सपाट करण्यासाठी वापरला जाणारा जड दगडी रोलर काही अल्पवयीन मुले चालवत होती.
हेही वाचा : महिला PSI ने आंतरजातीय विवाह केला अन् वर्षभरातच..., हादरवून टाकणारी घटना









