महिला PSI ने आंतरजातीय विवाह केला अन् वर्षभरातच..., हादरवून टाकणारी घटना
एका महिला पोलिस उपनिरिक्षकाने केलेल्या गंभीर आरोपांमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. बंदूकीच्या धाकाने सासऱ्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महिला PSI ने आंतरजातीय केला अन् वर्षभरातच...
हादरवून टाकणारी घटना
Crime News : एका महिला पोलिस उपनिरिक्षकाने केलेल्या गंभीर आरोपांमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. बंदूकीच्या धाकाने सासऱ्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच नवऱ्याने विष देऊन तिला मारण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षी तिने शुभम सिंहसोबत आंतरजातीय विवाह केला होता. पीडितेचा आरोप आहे की, लग्न झाल्यापासूनच सासरच्या लोकांनी तिच्या जातीवरून टोमणे मारत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. तिला वारंवार अपमानित केले जात होते आणि पोलीस उपनिरीक्षकाची नोकरी सोडण्यासाठी तिच्यावर सतत दबाव टाकला जात होता. उत्तर प्रदेशातील लखनऊमधील ही घटना आहे.
'असा' झाला आंतरजातीय विवाह
या संपूर्ण प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, स्वतः पोलीस दलात कार्यरत असूनही स्थानिक पोलिसांनी सलग चार दिवस पीडितेची कोणतीही तक्रार ऐकून घेतली नाही. मात्र, या प्रकरणाने जोर धरल्यानंतर आता पोलिसांनी पती, सासरा, सासू आणि नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मूळची लखनऊच्या पारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहणारी ही पीडित महिला सध्या प्रयागराज जिल्ह्यात उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. तिचा विवाह 14 फेब्रुवारी 2025 रोजी शुभम सिंह नावाच्या तरुणाशी झाला होता. हा आंतरजातीय विवाह होता.
हे ही वाचा : मनोज जरांगेंचं रखरखत्या उन्हात उपोषण, काय आहे फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया?
पीडितेचा अतोनात छळ
पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत अंगावर काटा आणणारा घटनाक्रम मांडला आहे. नोकरी सोडण्यास नकार दिल्याने आणि सासरच्या छळाला विरोध केल्याने, तिच्या सासऱ्याने घरात असलेल्या परवानाधारक बंदुकीचा धाक दाखवून तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर अत्याचार केला. जेव्हा तिने हा प्रकार पतीला सांगितला, तेव्हा पतीने तिला साथ देण्याऐवजी तोंड बंद ठेवण्याची धमकी दिली. क्रूरतेची सीमा इथेच संपली नाही. 19 जानेवारी 2026 रोजी पतीने तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले आणि तिने विरोध केला असता, सासरच्या मंडळींनी मिळून तिला उंदीर मारण्याचे विष पाजले व तिला तडपत असताना एका खोलीत कोंडून ठेवले. पीडितेने कसाबसा तिच्या वडिलांशी फोनवर संपर्क साधला, ज्यानंतर वडिलांनी घटनास्थळी पोहोचून तिला गंभीर अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, जिथे तिचा जीव थोडक्यात वाचला.









