'ठाकरे चुकले तर त्यांच्याही...' राज यांचं भाषण सुरु असतानाच जेन झी भडकलेली!
thackeray brothers mumbai victory rally : मुंबईतील विजयी सभेत जेनझी तरुणांनी आंदोलन, राजकारण आणि उत्तरदायित्वावर स्पष्ट भूमिका मांडली. पक्ष कोणताही असो, जनतेने सत्ताधाऱ्यांकडून कायम उत्तरदायित्वाची मागणी केली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'ठाकरे चुकले तर त्यांच्याही...'
राज यांचं भाषण सुरु असतानाच जेन झी भडकलेली!
thackeray brothers mumbai victory rally : धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी प्रल्हाद जोशी यांची नवे केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर मुंबईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत विजयी सभा पार पडली. या सभेदरम्यान उपस्थित असलेल्या जेनझी तरुणांशी 'मुंबई Tak' ने संवाद साधला. या संवादात आंदोलन, राजकीय जबाबदारी, पोस्टर्स आणि विद्यार्थ्यांच्या अपेक्षांवर विविध प्रतिक्रिया समोर आल्या.
हेही वाचा : 'Friends..', PM मोदींचा नवा Reel; काँग्रेसकडून निवडणूक लढलेल्या व्यक्तीकडे Task Force ची जबाबदारी
भ्रष्टाचार आणि विविध प्रश्नांवर सातत्याने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार
संवादादरम्यान एका तरुणाने नितीन गडकरी यांच्याविरोधातील पोस्टरकडे लक्ष वेधले. एथेनॉल आणि पेट्रोलच्या पर्यायाबाबत सरकारने सामान्य नागरिकांचा विचार करावा, अशी भावना त्याने व्यक्त केली. आंदोलन पुढेही सुरू राहणार का, असा प्रश्न विचारला असता, हे आंदोलन अल्पकालीन नसून दीर्घकालीन लढा असल्याचे त्याने सांगितले. "हे स्प्रिंट नाही, ही मॅरेथॉन आहे," असे म्हणत भ्रष्टाचार आणि विविध प्रश्नांवर सातत्याने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्याने व्यक्त केला.
हेही वाचा : Personal Finance: 7/12 उतारा पाहूनही फसवणूक होऊ शकते? जमीन घेण्यापूर्वी करू नका ‘ही’ चूक
