'Friends..', PM मोदींचा नवा Reel; काँग्रेसकडून निवडणूक लढलेल्या नेत्याकडे Task Force ची जबाबदारी
PM Modi New Reel: नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा सुधारणांसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली एका उच्चाधिकार कार्यदलाच्या स्थापनेची घोषणा केली आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: पेपर लीक प्रकरणी आंदोलनाची धग वाढल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे रिल्सच्या माध्यमातून तरूणांशी सातत्याने संवाद साधत आहे. आज (26 जुलै) पुन्हा एकदा त्यांनी एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी परीक्षा सुधारणांसंदर्भात एक मोठा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज समजले जाणारे नंदन नीलेकणी (Nandan Nilekani) यांच्या नेतृत्वाखाली एका उच्चाधिकार टास्क फोर्सची घोषणा केली आहे.
पाहा नव्या Reel मध्ये काय म्हणाले पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुन्हा एकदा इंस्टाग्रामवर परीक्षा सुधारणांसंदर्भात एक मोठी घोषणा केली. ते म्हणाले,
"भारत सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सातत्याने अनेक पावले उचलत आहे. ज्यांनी आपल्या भविष्याशी तडजोड केली आहे, ते तुरुंगात सडत आहेत."
त्यांनी पुढे सांगितले की, 'आम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केली आहेत आणि संसदेत कठोर तरतुदींसह नवीन कायदा लागू करण्याच्या दिशेने पुढे जात आहोत. पण आपण भविष्याचा विचार केला पाहिजे.'
हे ही वाचा>> Gen Z आंदोलन: ज्येष्ठ संपादक राजदीप सरदेसाईंनी सांगितल्या 'त्या' 5 मोठ्या गोष्टी, ज्यांनी बदलली देशाच्या राजकारणाची दिशा!
पंतप्रधान मोदी म्हणाले,
