'मी जंगलाच्या अंतिम संस्काराला आलोय...' कर्जतमधील वृक्षतोडीवरून राज ठाकरेंचा संताप

कर्जतमध्ये टोरंट कंपनीच्या प्रकल्पासाठी केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीविरोधात राज्यभरातून आवाज उठला आहे. याविषयी बोलताना राज ठाकरे यांनी 'मी जंगलाच्या अंतिम संस्काराला आलोय असं वाटलं' अशी खंत व्यक्त केली.

ADVERTISEMENT

Raj Thackeray
Raj Thackeray
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

वृक्षतोडीवरुन राज ठाकरेंचा संताप

point

सत्ताधाऱ्यांवर डागली तोफ

point

डोळ्यात अंजन घालणारं भाषण

Raj Thackeray : कर्जतमध्ये टोरंट कंपनीच्या प्रकल्पासाठी केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीविरोधात राज्यभरातून आवाज उठला आहे. आज (28 ऑक्टोबर) मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी एक भव्य सभाही घेतली. यामध्ये बोलताना त्यांनी 'मी जंगलाच्या अंतिम संस्काराला आलोय असं वाटलं' अशी खंत व्यक्त केली. तसेच गुजरातमधील दोन माणसं महाराजांचा महाराष्ट्र चालवणार का असा सवालही उपस्थित केला. 

'मी जंगलाच्या अंतिम संस्काराला आलोय'

राज ठाकरे म्हणाले, 'मी जंगलाच्या अंतिम संस्काराला आलोय असं मला वाटलं. कोणत्यातरी गुजराती व्यक्तीसाठी अख्खं जंगल कापून टाकताहेत. या प्रकल्पाची काय गरज आहे? या गोष्टींमागचं षडयंत्र नीट समजून घेतलं पाहिजे.' तसेच ते म्हणाले की, राज्यात अधिकारपदावर बसलेले जे आहेत मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील त्यांना केंद्रात जे दोघे बसलेत त्यांच्याकडून शून्य किंमत आहे.'

हे ही वाचा : विधान परिषद निवडणुकीचा पहिला निकाल आला हाती, कोणी मिळवला प्रचंड मोठा विजय?

'गुजरातमधील दोन माणसं हा महाराजांचा महाराष्ट्र चालवणार?'

सरकारच्या धोरणांवर टीका करताना ते म्हणाले की, 'गुजरातमधील दोन माणसं हा महाराजांचा महाराष्ट्र चालवणार? आमचा सह्याद्री पोखरणार? आणि आम्ही हतबल. आम्हाला काही नाही. आज मी फिरताना त्या गावातील महिला येऊन मला भेटल्या. हातात छोटंसं लेकरु घेऊन आल्या होत्या की काहीही करा दादा, आमचं जंगल वाचवा (असं त्या म्हणाल्या) तुमच्यावर हात जोडायची वेळ येते? तुमचे कोयते काय करतात? ते कोयते काय फक्त फांद्या छाटायला आहेत का? असे सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केले.'

हे ही वाचा : Govt Jobs : गोवा शिपयार्डमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु, लगेच करा अर्ज

'ही हिंमत येते कुठून?'

यापुढं ते म्हणाले की, 'मी विधानसभेला सांगत होतो हा महाराष्ट्र जर यांच्या हातामध्ये गेला तर तो महाराष्ट्राच्या हातात राहणार नाही, तर या दोन माणसांच्या हातात जाईल आणि ते वाटेल ते करतील महाराष्ट्रामध्ये. वाटेल ते म्हणजे वाटेल ते. ही हिंमत येते कुठून? ही हिंमत येते तुमच्यातूनच (लोकांमधून). मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय हे. आज रडत बसायचं. राजकीय पक्षांकडे जायचं आणि त्यांना सांगायचं की आमच्यावर अन्याय होतोय. आमच्याकडची जंगलं कापली जाताहेत आणि निवडणुकीच्या तोंडावरती जातीच्या, धर्माच्या नावावर नाहीतर पैसे घेऊन मतदान यांना करायचं. हे परत निवडून  येणार. परत तुमच्यावर वरवंटा फिरवणार. परत पाच वर्ष तुम्ही बोंबलत राहणार. परत पाच वर्षानंतर परिस्थिती तीच.'

हे ही वाचा : मुंबईची खबर : मुंबईकरांनो, पुढील सात दिवस पाणी उकळून प्या; अन्यथा...

'तुम्हाला विकत घेतलं जातंय'

महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर टीका करताना ते म्हणाले की, 'आमच्या माता भगिनींना लाडकी बहीण योजनेतून महिन्याला दीड हजार रुपये मिळतात. किती काळ पुरणार दीड हजार रुपये. या दीड हजार रुपयांमध्ये तुम्हाला विकत घेतलं जातंय. तुमची तोंडं बंद केली जाताहेत. की जेणेकरुन आम्ही (सत्ताधारी) जो हैदोस घालू त्यावर तुम्ही बोलता कामा नये. महाराष्ट्रात जे काही लोक सत्तेवर बसलेत यांच्या हातात काहीच नाही.' 

हे ही वाचा : शिंदेंच्या घराकडे निघालेल्या पुर्णेकर कुटुंबाला रोखताच ठाण्यामध्ये राडा

'आम्हाला माणसं हटवून द्या'

यापुढं ते म्हणाले की, 'एके दिवशी मी मुख्यमंत्र्यांचं निवेदन ऐकत होतो. स्वत: मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं की केंद्राने आणि एका खासगी कंपनीने मिळून ठरवलं आणि त्यांनी मिळून आम्हाला प्रस्ताव सांगितला आणि नंतर या सगळ्या गोष्टी सुरु झाल्या. हे सगळं वरती ठरतं. उद्योगपती वरती जातात. मोदी आणि शहांना भेटतात आणि सांगतात आम्ही जमीन बघितली आहे, आम्हाला प्रोजेक्ट करायचा आहे आम्हाला माणसं हटवून द्या, नाहीतर झाडं हटवून द्या. मग लगेच वरुन खाली फोन येतात.'