पाच अल्पवयीन मुलींवर बलात्कार, वृत्तपत्र मालकाला 10 वेळा जन्मठेपेची शिक्षा; काय आहे प्रकरण?

भोपाळमधील एका वर्तमानपत्राचा मालक 2014 पासून मुलींना लक्ष्य करत होता. तो त्यांना आपल्या घरी दहा हजाप रुपये मासिक पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून बोलावून घेत असे आणि त्यानंतर त्यांचे लैंगिक शोषण करत असे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

वृत्तपत्राच्या मालकाला 10 जन्मठेपांची शिक्षा

point

अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणातील प्रमुख आरोपी

point

सहकारी महिलेलाही 20 वर्षांचा कारावास

Crime News : विशेष पॉक्सो (POCSO) न्यायालयाने अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भोपाळमधील एका वृत्तपत्राचे माजी मालक प्यारे मियाँ यांना 10 वेगवेगळ्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, अशी माहिती 'प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया' (PTI) या वृत्तसंस्थेने दिली आहे. या प्रकरणात 78 वर्षीय प्यारे मियाँ यांच्यावर न्यायालयाने 77.64 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. तसेच या गुन्ह्यात मदत करणाऱ्या त्यांची सहकारी राबिया बी हिला 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

पीडितेनं सांगितला भयानक प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, प्यारे मियाँ 2014 पासून अल्पवयीन मुलींना आपले लक्ष्य करत होते. ते मुलींना आपल्या घरी महिना 10,000 रुपये पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण आणि बलात्कार करायचे. त्यांची सहकारी राबिया बी या गुन्ह्यांमध्ये त्यांना मदत करत असे. भोपाळमधील शाहपुरा भागातील एका फ्लॅटवर वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने बोलावून दारू पाजून लैंगिक अत्याचार केल्याचे एका पीडितेने 11 जुलै 2020 रोजी समुपदेशनादरम्यान उघड केले. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले.

हे ही वाचा : 16 वर्षीय पुतणीसोबत 'या' कारणावरुन वाद, चुलत्याने कुऱ्हाडीने केले 40 वार, नंतर शेतात जाऊन...

तब्बल दहा जन्मठेपांची शिक्षा

या घटनेनंतर इतर अनेक अल्पवयीन मुलींनीही अशाच प्रकारे आपले शोषण झाल्याची माहिती दिली. विशेष सरकारी वकील पी. एन. सिंह राजपूत यांनी सांगितले की, फिर्यादी पक्षाने प्यारे मियाँ यांच्यावरील सर्व आरोप न्यायालयात यशस्वीपणे सिद्ध केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 10 जन्मठेपांची शिक्षा सुनावली. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून प्यारे मियाँ यांना अटक केली होती, त्यानंतर त्यांच्यावर, राबिया बी आणि इतर सहकाऱ्यांवर खटला चालवण्यात आला.

हे ही वाचा : सुवर्णपदक विजेता नीरज यादवने संपवलं आयुष्य; अ‍ॅथलेटिक्सने का उचललं एवढं टोकाचं पाऊल?

सर्व शिक्षा एकाच वेळी चालणार

न्यायालयाच्या या अंतिम निर्णयामुळे प्यारे मियाँ यांना 10 वेळा जन्मठेप आणि 77.64 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, तर राबिया बी हिला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. पॉक्सो कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार सुनावलेल्या या शिक्षेमध्ये आठ जन्मठेपेच्या शिक्षा प्यारे मियाँ यांच्या नैसर्गिक आयुष्याच्या अखेरपर्यंतच्या आहेत, तर दोन सामान्य जन्मठेपेच्या शिक्षांचा समावेश आहे. या सर्व शिक्षा एकाच वेळी (Concurrent) चालणार आहेत. या कठोर निर्णयामुळे अशा गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.