विधान परिषद निवडणुकीचा पहिला निकाल आला हाती, कोणी मिळवला प्रचंड मोठा विजय?

Amravati Teacher Constituency Election Result: अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे किरण सरनाईक यांनी 16,663 मतं मिळवत विजय मिळवला असून, निर्धारित कोट्यापेक्षा 529 अधिक मतं मिळवली आहेत.

ADVERTISEMENT

amravati teacher constituency election result shinde shiv sena kiran sarnaik wins 16663 votes congress shiv sena ubt
Amravati Teacher Constituency Election Result
Google CTA

धनंजय साबळे, अमरावती: महाराष्ट्रातील अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती समर्थित शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार किरण सरनाईक यांनी विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या अंतिम फेरीत सरनाईक यांनी विजयासाठी निर्धारित असलेला 16,134 मतांचा कोटा ओलांडत एकूण 16,663 मतं मिळवली. त्यामुळे त्यांनी विजयाच्या कोट्यापेक्षा 529 मतं अधिक मिळवत आपला विजय निश्चित केला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना अधिकृतपणे विजयी घोषित केलं.

या विजयानंतर सरनाईक यांच्या समर्थकांमध्ये आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आणि गुलाल उधळून विजयाचा आनंद साजरा केला. कुटुंबीयांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही सरनाईक यांचं अभिनंदन केलं.

अंतिम फेरीत 16,663 मतं; विजयाच्या कोट्यापेक्षा 529 मतं अधिक

अमरावती शिक्षक मतदारसंघातील मतमोजणीदरम्यान किरण सरनाईक यांनी विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांच्या कोट्यापर्यंत मजल मारली. अंतिम फेरीत त्यांना एकूण 16,663 मतं मिळाली. निवडणुकीत विजयी होण्यासाठी 16,134 मतांचा कोटा निर्धारित करण्यात आला होता. सरनाईक यांनी हा कोटा 529 मतांनी ओलांडला.

हे ही वाचा>> “मी एक प्रस्थापित गिळलाय”, 20 हजार मतं मिळवल्यानंतर रविराज साबळेंची प्रतिक्रिया

दुसरीकडे, काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे यांना या निवडणुकीत 8,027 मतं मिळाली. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सरनाईक यांच्या विजयाची घोषणा केली.

'बॅलेट पेपरच्या निकालातून EVM वर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उत्तर'

विजयानंतर किरण सरनाईक यांनी 'मुंबई Tak'शी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली. यावेळी त्यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात EVM वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या राजकीय पक्षांना आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करणाऱ्यांना या निकालाचा संदर्भ दिला.

सरनाईक यांच्या म्हणण्यानुसार, जे राजकीय पक्ष EVM च्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करतात आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करतात, त्यांनी या निवडणुकीच्या निकालाकडेही लक्ष द्यायला हवं. बॅलेट पेपरवर झालेल्या या निवडणुकीतील विजय हा अशा पक्षांच्या प्रश्नांना उत्तर असल्याचा दावा त्यांनी केला.

हे ही वाचा>> विधान परिषद निवडणूक निकाल 2026 LIVE : नागपूर पदवीधर मतदारसंघ मतमोजणी महत्वाची अपडेट

या निवडणुकीत महायुतीतील इतर उमेदवारही रिंगणात होते. त्यांच्या विरोधातील निकालातूनही संबंधितांना संदेश मिळाल्याचं सरनाईक यांनी म्हटलं.

विजयानंतर शिवसैनिकांचा जल्लोष

निकाल जाहीर होताच सरनाईक यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गुलाल उधळला. विजयाची घोषणा झाल्यानंतर सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली.

अमरावती शिक्षक मतदारसंघातील या निकालामुळे किरण सरनाईक यांनी पुन्हा एकदा आपलं राजकीय स्थान अधोरेखित केलं आहे. विशेष म्हणजे, बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीतील विजयाचा संदर्भ देत त्यांनी EVM बाबत विरोधकांकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांवर निशाणा साधला.

अमरावती शिक्षक मतदारसंघात होती तिरंगी लढत

अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे दोन्ही गट आणि काँग्रेस यांच्यात लढत झाली. त्यामुळे या मतदारसंघातील निकालाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीत खालील उमेदवार रिंगणात होते.

  • किरण सरनाईक - शिवसेना (एकनाथ शिंदे गट), महायुती समर्थित उमेदवार
  • आदिती पोहरे - काँग्रेस
  • दत्तात्रय लहाने - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)

या निवडणुकीत महायुती समर्थित शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार किरण सरनाईक यांनी बाजी मारली. त्यांनी 16,663 मतं मिळवली. तर काँग्रेसच्या आदिती पोहरे यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.