Govt Jobs : गोवा शिपयार्डमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु, लगेच करा अर्ज

गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 नोव्हेंबर आहे.

ADVERTISEMENT

GSL Recruitment 2026
GSL Recruitment 2026
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

गोवा शिपयार्डमध्ये भरती

point

काय आहेत पात्रतेचे निकष?

point

जाणून घ्या सविस्तर

GSL Recruitment 2026 : गोवा शिपयार्ड लिमिटेडने (GSL) विविध पदांच्या एकूण 131 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये एक्झिक्युटिव्ह प्रवर्गासाठी 40 आणि नॉन-एक्झिक्युटिव्ह प्रवर्गासाठी 91 जागांचा समावेश आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. नोकरीचे ठिकाण गोवा असून, सरकारी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

काय आहेत पात्रतेचे निकष?

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादेचा विचार करता, एक्झिक्युटिव्ह पदांसाठी इंजिनिअरिंग पदवी, एमबीए, सीए किंवा एलएलबीसह संबंधित क्षेत्रात 4 ते 23 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे, तर वयोमर्यादा 33 ते 54 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तसेच नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा, आयटीआय, पदवी किंवा बीएससी नर्सिंगसह 2 वर्षांचा अनुभव मागितला असून, वयोमर्यादा 33 ते 41 वर्षे आहे. एससी/एसटी उमेदवारांना 5 वर्षे आणि ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सवलत देण्यात आली आहे.

हे ही वाचा : मुंबईची खबर : मुंबईकरांनो, पुढील सात दिवस पाणी उकळून प्या; अन्यथा...

'असा' करा अर्ज

सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. या भरतीसाठी अर्ज शुल्क म्हणून एक्झिक्युटिव्ह पदांसाठी जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी 500 रुपये, तर नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी 200 रुपये शुल्क आहे. एससी, एसटी, पीडब्लूडी आणि माजी सैनिकांना फीमध्ये पूर्ण सूट देण्यात आली असून अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे.

हे ही वाचा : पाच अल्पवयीन मुलींवर बलात्कार, वृत्तपत्र मालकाला 10 वेळा जन्मठेपेची शिक्षा; काय आहे प्रकरण?

अर्जाची शेवटची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2026 आहे. उमेदवारांनी विहित मुदतीत अधिकृत संकेतस्थळ goashipyard.in यावर जाऊन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.