विद्यार्थ्यांना मारहाणीचा आदेश कोणी दिला? राहुल गांधींच्या पत्रातून अमित शाहांना दोन तिखट सवाल

मुंबई तक

Rahil Gandhi : दिल्लीच्या जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होते, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील आंदोलन संपवण्यात आलं आहे. मात्र, याच आंदोलनादरम्यान, विद्यार्थ्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असल्याने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमित शहांना, मुलांना मारहाणीचे आदेश कोणी दिले? असा प्रश्न केला.

ADVERTISEMENT

Rahil Gandhi
Rahil Gandhi
Google CTA

बातम्या हायलाइट

point

राहुल गांधी यांचं ट्विट

point

विद्यार्थ्यांच्या मारहाणप्रकरणात अमित शाहांना प्रश्न

Rahil Gandhi : दिल्लीच्या जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होते, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील आंदोलन संपवण्यात आलं आहे. मात्र, याच आंदोलनादरम्यान, विद्यार्थ्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असल्याने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमित शहांना, मुलांना मारहाणीचे आदेश कोणी दिले? असा प्रश्न केला. ते म्हणाले की, "एका 19 वर्षीय साहिल लोचाब याला भेटलो असताना, त्याच्या डोळ्याला पेलेट लागल्याने त्याचा एक डोळा कायम गमवाला लागला आहे. याचा गुन्हा काय होता?", असा प्रश्न अमित शहा यांना विचारण्यात आलाय. 

हे ही वाचा : मंगळाचा मिथुन राशीत प्रवेश, 'या' राशींचे अच्छे दिन येणार

राहुल गांधी यांचं ट्विट जसंच्या तसं

राहुल गांधी ट्विटच्या माध्यमातून लिहितात की, "दिल्लीत शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पेलेट गन, लाठ्या आणि अश्रुधूर वापरण्यात आला. मी 19 वर्षीय साहिल लोचाबला भेटलो. पेलेट लागल्याने तो आपला एक डोळा गमावू शकतो. त्याचा “गुन्हा” काय? पेपरफुटी थांबवण्याची आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी एका उज्ज्वल भविष्याची मागणी करणे", 

पुढे ते म्हणाले की, "अमितशाह, माझे दोन प्रश्न आहेत: 1. विद्यार्थ्यांविरुद्ध पेलेट गनसह प्राणघातक बळाचा वापर करण्यास तुम्ही मंजुरी दिली होती का? नसेल तर, कोणी दिली? 2. विद्यार्थ्यांना लाठ्यांनी मारहाण करणारे साध्या वेशातील लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक? त्यांच्या तैनातीला कोणी परवानगी दिली? देश उत्तर मागत आहे," असं राहुल गांधी यांनी ट्विट करत अमित शहा यांच्याकडे उत्तराची मागणी केलीय.  

हे ही वाचा : "खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री इथेनॉलवर..",उद्धव ठाकरेंचा नितीन गडकरींवर प्रहार

दरम्यान, आंदोलनादरम्यान, काही विना वर्दीचे लोक विद्यार्थ्यांना मारहाण करत होते. ते लोक नेमके त्या आंदोलनात कसे आले? असा प्रश्न उपस्थित होतोय. काही पोलिसांच्या नेम प्लेटवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना पोलिसांनी देखील मारहाण केली होती. यालाच गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचं आता देशातील लोक म्हणू लागले आहेत.  याचपार्श्वभूमीवर आता राहुल गांधी यांनी ट्विट करत अमित शहांकडे काही प्रश्न केले आहेत.