"खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री इथेनॉलवर..",उद्धव ठाकरेंचा नितीन गडकरींवर प्रहार
uddhav thackeray slams nitin gadkari : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईतील विद्यार्थ्यांच्या विजयोत्सवात उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी नितीन गडकरींसह केंद्रातील अनेक मंत्र्यांवर टीका केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
"खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री इथेनॉलवर.."
उद्धव ठाकरेंचा नितीन गडकरींवर प्रहार
uddhav thackeray slams nitin gadkari : धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन थांबले असून, त्यानंतर मुंबईत विद्यार्थ्यांकडून विजयोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मुंबईकरांनीही उपस्थिती लावली. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच रोहित पवार यांच्यासह विविध विरोधी पक्षांचे नेते या विजयोत्सवात सहभागी झाले. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळावर जोरदार टीका केली.
हेही वाचा : पेट्रोलमध्ये आता इथेनॉलचं मिश्रण, त्यात सुद्धा भेसळ; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर घणाघात
एका झुरळाने हुकूमशहाला झुकवलं - उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले, "आज मी सर्वांचं केवळ अभिनंदन करत नाही, तर देशातील तमाम देशभक्तांना अभिवादन करत आहे. आज कोणतीही निवडणूक कोणी जिंकलेली नाही, मात्र अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकले आहेत. ही संघर्षाची सुरुवात आहे. हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा आहे. या संघर्षामध्ये आपण सर्वजण जात, पात, धर्म आणि पक्ष विसरून भारतीय आणि देशभक्त म्हणून सहभागी झालो आहोत. मी कालच म्हटलं होतं, एका झुरळाने हुकूमशहाला झुकवलं आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे. मोदीजी, आता तरी देशाकडे लक्ष द्या. तुमचे मंत्री काम सोडून पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. त्यांना सांगा, देशाचं काम करा."
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्याला पाऊस झोडपणार, काही ठिकाणी यलो; तर कुठे रेड अलर्टचा अंदाज
