तुळजापूर: दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, बस-कारच्या अपघातात पाच जणांचा अंत

Tuljapur Accident : तुळजापूर येथे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बीडच्या माजलगाव येथे एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे.

ADVERTISEMENT

Tuljapur Accident
Tuljapur Accident
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला

point

बस-कारच्या अपघातात पाच जणांचा अंत

Tuljapur Accident : रोहिदास हातागले - तुळजापूर येथे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बीडच्या माजलगाव येथे एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे. खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या माजलगाव तालुक्यात शिंदेवाडी फाटा येथे भीषण अपघातात माजलगाव शहरातील गजानन नामदाससह इतर चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे एकजण गंभीरपणे जखमी झाला आहे. 

हे ही वाचा : Astrology : नवरात्रोत्सवाचा आठवा दिवस, 'या' राशींचं होणार भलं

रस्त्यावर निकृष्ट कामामुळे अनेकांचे बळी

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या माजलगाव - तेलगाव - धारूर या रस्त्यावर निकृष्ट कामामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. रस्त्यावर अनेक ठिकाणी जम्पिंग आहेत तसेच मधोमध भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळे हे अपघात सतत घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. घटनास्थळी याच महामार्गावर 50 ते 70 लोकांचा अपघात झाला होता. कंत्राटदारांवर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे. 

रेणुका मातेचे दर्शन घेत परतताना भक्तगणांवर काळाचा घाला 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूर गडावर नवरात्रोत्सवामुळे रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविक भक्तगण जात आहेत. अशातच काही भक्त हे रेणुका मातेचे दर्शन घेत परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. परतीच्या प्रवासादरम्यान भाविकांनी भरलेला टेम्पो केरोळी माहूर घाटाताली एका धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट 100 फुट खोल दरीत कोसळण्याची घटना आहे.

हे ही वाचा : ज्ञानेश कुमारांचा बचाव कोण करतंय? CJP च्या आंदोलनातून कोणते सवाल?

चालक प्रतीक अरविंद अडकिने (वय 26), दत्ता मनोहर मेश्राम (वय 35) आणि यशवंत अरविंद पाटील (वय 25) अशी जखमी झालेल्यांची ओळख समोर आली. तर मृतांची बाबाराम ज्ञानोबा टेकाम (वय 60), राहुल सुधाकरराव ठाकरे (वय 25) आणि प्रीतम रामराव प्रधान (वय 38) हे टेम्पोतून अपघातादरम्यान बाहेर फेकले गेले. ज्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.