Gen Z आंदोलन: ज्येष्ठ संपादक राजदीप सरदेसाईंनी सांगितलेले त्या 5 मोठ्या गोष्टी, ज्यांनी बदलली देशाच्या राजकारणाची दिशा!
तरूणांच्या आंदोलनाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याला कोणत्याही एका मोठ्या नेत्याचा चेहरा नव्हता. देशभरातून तरुण स्वतःहून पुढे आले. विद्यार्थी आणि स्वयंसेवकांनी मिळून आंदोलनाची धुरा सांभाळली, माध्यमांशी संवाद साधला आणि आपल्या मागण्या ठामपणे मांडल्या.
ADVERTISEMENT

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा केवळ एका मंत्र्याने पद सोडल्याचा प्रसंग नाही. तर मोदी सरकारला विद्यार्थी आणि युवा आंदोलनाच्या दबावामुळे राजकीय पातळीवर माघार घ्यावी लागल्याची ही पहिली मोठी घटना ठरली आहे. याआधी शेतकरी आंदोलनाच्या दबावाखाली केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतले होते. मात्र त्यासाठी सरकारला वर्षभराहून अधिक काळ लागला होता.
यावेळी मात्र निर्णय अत्यंत वेगाने आणि वैयक्तिक पातळीवर झाला. सत्तेचा पूर्ण पाठिंबा असलेल्या एका वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांनाही जनआक्रोशापासून वाचवता आलं नाही. पेपर लीकच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांनी उभारलेल्या आंदोलनातून भारतीय राजकारण आणि लोकशाहीबाबत पाच महत्त्वाचे मुद्दे समोर आले.
1. भारतातील तरुणांची ताकद कधीही कमी लेखू नका
बराच काळ असा समज होता की भारतातील तरुण राजकारणापासून दूर असतात. ते दिवसभर मोबाइलमध्ये गुंतलेले असतात आणि रील्स पाहण्यात रमलेले असतात. पण Cockroach Janta Party (CJP) च्या आंदोलनाने हा समज पूर्णपणे खोटा ठरवला.
विशेष म्हणजे, ज्याला वेळेची नासाडी म्हटलं जात होतं, त्याच सोशल मीडियाने आंदोलनाचं सर्वात प्रभावी शस्त्र म्हणून काम केलं. इंस्टाग्राम रील्स, मीम्स, व्हॉट्सअॅप ग्रुप्स आणि यूट्यूब लाइव्हच्या माध्यमातून माहिती इतक्या वेगाने पसरली की अनेक राजकीय पक्षांनाही ते शक्य झालं नसतं.
