जालना : चॉकलेटचं अमिष, 6 वर्षीय चिमुकलीवर 60 वर्षीय वृद्धाचा बलात्कार

मुंबई तक

Jalna Crime News : जालना शहरात सहा वर्षीय चिमुकलीवर 60 वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून गैरकृत्य केल्याच्या आरोपावरून सदर बाजार पोलिसांनी आरोपीला अटक केली.

ADVERTISEMENT

Jalna Crime News
Jalna Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

जालना : चॉकलेटचं अमिष घरात नेलं

point

6 वर्षीय चिमुकलीवर 60 वर्षीय वृद्धाचा बलात्कार

Jalna Crime News : जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीत सहा वर्षीय चिमुकलीवर 60 वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीला आपल्या घरी बोलावत तिच्याशी गैरकृत्य केल्याचा आरोप आहे. पीडिता घरी एकटी असताना आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून घरी बोलावल्याची माहिती आहे. त्यानंतर तिच्याशी गैरकृत्य केल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे जालना शहरात खळबळ उडाली आहे.

पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक 

घटनेनंतर चिमुकलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर तिच्या आईने रात्री सदर बाजार पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी दिनेश सुवर्णकार (वय 60) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तक्रार मिळाल्यानंतर सदर बाजार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.

माजी आमदार कैलास गोरंट्याल आक्रमक

आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. दरम्यान, आरोपीला नागरिकांच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी काही नागरिकांसह सदर बाजार पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. आरोपीला आमच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीमुळे पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांची गर्दी झाली.

सहा वर्षीय चिमुकलीवरील या घटनेनंतर जालना शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर बाजार पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात पोलीस कायदेशीर कारवाई करत असून घटनेशी संबंधित माहितीच्या आधारे पुढील तपास केला जात आहे.