शिक्षकाने विद्यार्थीनीला वासनेचा बळी बनवून केलं गर्भवती, पीडितेनं उचललं टोकाचं पाऊल
Crime News : शिक्षक-विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शिक्षकानं विद्यार्थीनीला वासनेचं बळी बनवलं. विद्यार्थीनी जेव्हा गर्भवती झाली असता, तिने आत्महत्या करत जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शिक्षक-विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा
शिक्षकाकडून विद्यार्थीनीला शारीरिक त्रास
Crime News : शिक्षक-विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शिक्षकानं विद्यार्थीनीला वासनेचं बळी बनवलं. विद्यार्थीनी जेव्हा गर्भवती झाली असता, तिने आत्महत्या करत जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना बिहारच्या गयाजी जिल्ह्यातील बेलागंजच्या समसपुर उच्च विद्यालयातील शिक्षक अभिषेक कुमारला विद्यार्थीनीच्या शारीरिक शोषणाच्या आरोपाखाली अटक केली. या प्रकरणात पीडित विद्यार्थीनीच्या आईने शनिवारी बेळगंज पोलिसांनी लेखी माहिती दिली, नंतर विद्यार्थीनीने 9 ऑगस्ट रोजी जीवन संपवलं.
हे ही वाचा : Astrology : ऑक्टोबरमध्ये गुरूच्या भ्रमणात बदल होणार, 'या' राशींचे भाग्य उजळणार
शिक्षकाने मुलीची फसवणूक करून केले अनैतिक कृत्य
विद्यार्थीनीच्या आईने गंभीर आरोप केला की, शाळेतील सहय्यक शिक्षक अभिषेक कुमार याने तिच्या मुलीची फसवणूक करून तिच्यासोबत अनैतिक कृत्य केले. ज्यामुळे ती गर्भवती राहिली होती. याच त्रासाला कंटाळून मुलीने जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना आहे. शुक्रवारी कुटुंबीय आणि स्थानिक रहिवाशांनी आरोपी शिक्षकाच्या अटकेची मागणी करत शाळेच्या आवारात गोंधळ घातला होता. पोलिसांनी शिक्षकाला पोलीस ठाण्यात नेले, नंतर लेखी तक्रार मिळाल्यानंतर, शनिवारी आरोपी शिक्षकाला तुरूंगात पाठवण्यात आले.
शिक्षकावरील आरोपांची माहिती मिळताच, गावकऱ्यांपकी मोठ्या संख्येनं लोक शिक्षकावर कारवाईची मागणी करत समसपूर हायस्कूलजवळ पोहोचले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती, नंतर जमावाला शांत करत आरोपी शिक्षकाला अटक केली आणि पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते.
हे ही वाचा : बाथरुममध्ये महिलेचा मृतदेह, नवरा अन् 6 महिन्यांचं बाळ गायब; धक्कादायक हत्याकांड!
शिक्षकाकडून विद्यार्थीनीला शारीरिक त्रास
या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, तक्रारीनुसार, शिक्षकाने विद्यार्थीनीला शारीरिक त्रास दिला. या छळाला कंटाळून आणि मानसिक दबावाखाली येऊन विद्यार्थ्याला शारीरिक त्रास दिला. या छळाला कंटाळून आणि मानसिक दबावाखाली येऊन विद्यार्थ्याने 9 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. आईने शनिवारी शिक्षकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणात पोलीस पुढील कारवाई करण्यात येतेय.
