Astrology : ऑक्टोबरमध्ये गुरूच्या भ्रमणात बदल होणार, 'या' राशींचे भाग्य उजळणार
Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू ग्रहाला ज्ञान, संपत्ती, शिक्षण, करिअर आणि विस्ताराचा घटक मानले जाते. गुरूच्या राशीबदलाचा परिणाम हा काही राशीतील लोकांवर निर्माण होणार आहे. ऑक्टोबर २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात, देवगुरू गुरू कर्क राशी सोडून सूर्याच्या राशीत, म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करेल. या काळात आत्मविश्वास वाढण्याची, करिअरमध्ये प्रगती होण्याची आणि आर्थिक स्थिती अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. अशातच जाणून घेऊयात गुरू ग्रहाचे सिंह राशीतील संक्रमणाचा इतर काही राशींवर फायदेशीर परिणाम होतो.
ADVERTISEMENT

1/6
ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू ग्रहाला ज्ञान, संपत्ती, शिक्षण, करिअर आणि विस्ताराचा घटक मानले जाते. गुरूच्या राशीबदलाचा परिणाम हा काही राशीतील लोकांवर निर्माण होणार आहे. ऑक्टोबर २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात, देवगुरू गुरू कर्क राशी सोडून सूर्याच्या राशीत, म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करेल. या काळात आत्मविश्वास वाढण्याची, करिअरमध्ये प्रगती होण्याची आणि आर्थिक स्थिती अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. अशातच जाणून घेऊयात गुरू ग्रहाचे सिंह राशीतील संक्रमणाचा इतर काही राशींवर फायदेशीर परिणाम होतो.

2/6
मेष
गुरू ग्रहाचे सिंह राशीतील संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने अनुकूल मानले जाते. नोकरी आणि करिअर करणाऱ्यांना प्रगतीच्या नवीन संधी मिळणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा मजबूत होऊ शकते. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा अनुकूल असतो. एखादा नवीन करार किंवा व्यवसायाची संधी समोर येऊ शकते, ज्यामुळे भविष्यात चांगला फायदा होईल.

3/6
कर्क
कर्क राशीच्या लोकांना आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन मार्ग खुले होण्याची अधिकची शक्यता आहे. आर्थिक बाबींमध्ये चांगली सुधारणा होण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना पदोन्नती किंवा नवीन नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांच्या जीवनातील परिस्थिती अनुकूल राहण्याची अपेक्षा आहे.

4/6
सिंह
गुरू ग्रह हा सिंह राशीत प्रवेश करत आहे, ज्याचा काही राशीत जन्मलेल्या व्यक्तींवर या संक्रमणाचा महत्त्वपूर्ण परिणाम होईल. तुमची नेतृत्व कौशल्ये अधिक मजबूत होतील. तुम्ही तुमच्या निर्णयांबद्दल अधिक स्पष्ट विचार करू शकाल. कामाच्या ठिकाणी आपली प्रतिष्ठा वाढेल.

5/6
वृश्चिक
वृश्चिक राशीतील गोचर हे या राशीच्या लोकांसाठी करिअरच्यादृष्टीने आघाडीवर महत्त्वपूर्ण मानले जाते. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदार्या एक मोठी संधी देखील घेऊन येऊ शकतात. करिअरची दिशा सुधारू शकते. व्यावसायिक लोक नवीन लोकांशी संपर्क साधू शकतात.

6/6
धनु
धनु राशीचा स्वामी ग्रह गुरू, स्वत: एक गुरू ग्रह आहे. त्यामुळे, या राशीत जन्मलेल्यांसाठी हे गोचर ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानले जाते. बऱ्याच काळापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना चांगली बातमी मिळू शकते. नोकरी बदलणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते.
