पुण्यात खळबळ! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले दोन मानवी पाय, पोलिसांनी केला धक्कादायक उलगडा

पुण्यातील पिंपळे गुरव येथे एका गोणीत दोन मानवी पाय सापडले होते. या क्रूर गुन्ह्याचा शोध घेताना पुणे पोलीस आरोपीपर्यंत कसे पोहोचले, जाणून घ्या.

ADVERTISEMENT

Pune Crime
Pune Crime
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पुण्यात खळबळ!

point

गोणीत सापडले मानवी पाय

point

आरोपी नेमका कोण?

Pune Crime : पुण्यातील पिंपळे गुरव परिसरात एक धक्कादायक घटना घडली होती. रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका गोणीमध्ये मानवी पाय सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. रामकृष्ण मंगल कार्यालय ते काटेपुरम चौक दरम्यान शुक्रवारी (6 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजता कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रक्ताने भरलेली एक गोणी दिसली. सुरुवातीला श्वानाचे अवशेष असावेत असा संशय होता; मात्र गोणी उघडताच त्यात गुडघ्यापासून कापलेले पुरुषाचे दोन पाय आढळून आले. या अत्यंत निर्घृण हत्याकांडाचा सांगवी पोलिसांनी अत्यंत तत्परतेने तपास करत अवघ्या काही तासांत उलगडा केला आहे.

पाय गोणीत, मृतदेह कुठे?

या तपासात गोणीत सापडलेले एक सिम कार्डचे कव्हर पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरले. कव्हरवर लिहिलेल्या मोबाईल नंबरवरून सांगवी पोलिसांनी धागेधोरे जोडत मृत व्यक्तीची ओळख अनिल खाडे म्हणून पटवली. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवून पोलीस संशयित आरोपीच्या घरापर्यंत पोहोचले. आरोपीच्या घराला बाहेरून कुलूप होते, परंतु घरातून दुर्गंधी येत असल्याने पोलिसांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. तेथे अनिल खाडे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.

हे ही वाचा : राजकीय मतभेद बाजूला! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची रीघ, ब्रीच कँडी रुग्णालयात काय घडलं?

हत्या नेमकी कशी झाली?

पोलिसांच्या तपासानुसार, अनिल खाडे आणि विष्णू कुंभार हे मित्र होते. हत्येच्या आधी ते एकत्र दारू पीत होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि विष्णू कुंभारने अनिलच्या डोक्यात लोखंडी वस्तूने प्रहार करून त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर आरोपीने कोयत्याने अनिलचे दोन्ही पाय गुडघ्याखाली कापले. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने, आरोपीने कापलेले पाय एका पोत्यात भरून रामकृष्ण मंगल कार्यालय आणि काटेपुरम चौक यांच्यामधील रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्यात फेकून दिले.

हे ही वाचा : Gokul Election : पराभव पचवता आला नाही म्हणून कायदाच बदलला?

आरोपीला ठोकल्या बेड्या

या सनसनाटी गुन्ह्याचा छडा लावत सांगवी पोलिसांनी मुख्य आरोपी विष्णू तानाजी कुंभार याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त मनीषा कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.