आई शेजारच्या तरुणासोबत आक्षेपार्ह अवस्थेत, 14 वर्षीय मुलानं बघितलं अन् घडलं भयंकर
कानपूरमधील एका महिलेने आपल्या 14 वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे. अनैतिक संबंध उघडे होतील या भीतीने हत्या केल्याचे समोर आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आई शेजारच्या तरुणासोबत आक्षेपार्ह अवस्थेत
14 वर्षीय मुलानं बघितलं अन् घडलं भयंकर
Crime News : एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षांच्या मुलाने स्वतःच्या आईला शेजारच्या युवकासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. या अनैतिक संबंधांना मुलाने जोरदार विरोध दर्शवला. यामुळे संतप्त झालेल्या आईने आपल्या प्रियकराच्या मदतीने पोटच्या गोळ्याचा गळा आवळून अत्यंत निर्घृणपणे खून केला. या खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील ही घटना आहे.
अनैतिक संबंधाची गावभर चर्चा
गुरुवारी (10 सप्टेंबर) रात्री घडलेल्या या थरारानंतर आरोपी आईने संपूर्ण रात्र मुलाच्या मृतदेहाजवळ बसून काढली आणि गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सकाळी तिने मुलाची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची आवई उठवली. मात्र, महिला आणि तिच्या शेजाऱ्याच्या अनैतिक संबंधांबाबत आधीपासूनच परिसरात चर्चा सुरू असल्याने ग्रामस्थांना संशय आला. त्यांनी कोणताही विलंब न करता तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली.
हे ही वाचा : मित्राच्या पत्नीसोबत अनैतिक संबंधाचा संशय, भाजप नेत्याच्या पुतण्याची हत्या
पोस्ट मार्टममध्ये सत्य उघडकीस
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांना तपासादरम्यान मुलाच्या मानेवर आणि शरीरावर संशयास्पद जखमांच्या खुणा आढळून आल्या. त्यामुळे हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपात असल्याचा संशय बळावला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो तात्काळ पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर गळा दाबल्यामुळेच मुलाचा गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
हे ही वाचा : ब्युटी पार्लर चालवणाऱ्या पत्नीसह 3 मुलींना संपवलं, भयंकर हत्याकांड
वडील कामानिमित्त मुंबईत
मृत मुलाचे वडील मुंबईत शटरिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. घरात त्यांची पत्नी आणि तीन मुले राहत होती. आईच्या अनैतिक संबंधांची माहिती वडिलांना आणि इतरांना उघड होईल या भीतीपोटीच मुलाची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
