ब्युटी पार्लर चालवणाऱ्या पत्नीसह 3 मुलींना संपवलं, भयंकर हत्याकांड
Jaipur Crime News : जयपूरमध्ये एका पित्याने पत्नी आणि तीन मुलींची दगडाने हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर आरोपीने वृद्ध वडिलांना चहा पाजला आणि घरातून फरार झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ब्युटी पार्लर चालवणाऱ्या पत्नीसह 3 मुलींना संपवलं
जयपूरमध्ये भयंकर हत्याकांड
Jaipur Crime News : जयपूरच्या करधनी परिसरात एकाने पत्नी आणि तीन मुलींची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घरातील सर्वजण झोपेत असताना आरोपी राहुल झा याने दगडाने पत्नी आणि तीन मुलींवर हल्ला केला. या हल्ल्यात गीता झा, 23 वर्षीय नंदिनी, 18 वर्षीय राधिका आणि 14 वर्षीय गौरी यांचा मृत्यू झाला. गोविंद वाटिका परिसरात घडलेल्या या घटनेची माहिती शुक्रवारी सकाळी सुमारे 10 वाजता पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घराची तपासणी केली असता पहिल्या मजल्यावरील एका खोलीत गीता झा यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर तळमजल्यावरील दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये तीन मुलींचे मृतदेह आढळले.
हेही वाचा : बीड: अंबाजोगाईत इमारतीचा स्लॅब भरताना दुर्घटना, विजेच्या धक्क्याने दोघांचा अंत
चारही जणी गाढ झोपेत असताना भंयकर हल्ला
पोलिसांच्या माहितीनुसार, चारही जणी गाढ झोपेत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. चारही मृतांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापतीच्या खुणा आढळल्या आहेत. घटनास्थळावरून पोलिसांना एक दगडही मिळाला असून, त्याचा हल्ल्यासाठी वापर झाल्याचा संशय आहे. डीसीपी वेस्ट प्रशांत किरण यांच्या माहितीनुसार, ही घटना रात्री उशिरा घडल्याची प्राथमिक शक्यता आहे. पोलिसांकडून घटनास्थळावर मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे त्या रात्रीची संपूर्ण घटनाक्रमाची वेळ निश्चित करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात राहुल झा याच्यावर पत्नी आणि तीन मुलींच्या हत्येचा आरोप असून, तो सध्या फरार आहे.
हेही वाचा : विद्यार्थीनी शाळेत जाताना नराधम करायचा पाठलाग, पीडितेनं कंटाळून संपवलं जीवन
