नागपूर : सून कपडे धुण्यात व्यस्त, अचानक सासरा आला अन्...

योगेश पांडे

जादूटोण्याच्या संशयावरुन सासऱ्याने सुनेची हत्या केली आहे. नागपूरमधील या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामागे नेमकं कारण काय?

ADVERTISEMENT

Nagpur Crime
Nagpur Crime
Google CTA

बातम्या हायलाइट

point

नागपूर : सून कपडे धुण्यात व्यस्त,

point

अचानक सासरा आला अन्...

Nagpur Crime : नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 70 वर्षीय सासऱ्याने स्वतःच्या 40 वर्षीय सुनेची कुऱ्हाडीने वार करून अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी सासऱ्याला सुनेवर करणी किंवा जादुटोणा करत असल्याचा संशय होता, याच रागातून हे हत्याकांड घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. लक्ष्मी रविशंकर पाली (वय 40) असे मृत महिला तर नाथूलाल पाली (वय 70) असे आरोपी सासऱ्याचे नाव आहे.

कुऱ्हाडीने केला जीवघेणा हल्ला

घटनेच्या वेळी मृत लक्ष्मी यांची मुलगी नोकरीवर गेली होती आणि मुलगाही काही कामानिमित्त घराबाहेर पडला होता. घरात कुणी नसल्याची संधी साधून, लक्ष्मी जेव्हा घराच्या मागच्या बाजूला कपडे धुण्यात व्यस्त होत्या, तेव्हा आरोपी नाथूलालने अचानक त्यांच्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला चढवला. कुऱ्हाडीचे जबर वार लागल्याने लक्ष्मी यांचा रक्ताच्या थारोळ्यात जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

हे ही वाचा : कुणबी प्रमाणपत्र कसं मिळवायचं? सरकारने कशी बदलली रणनीती?

विहीरीत उडी मारली अन्...

सुनेची हत्या केल्यानंतर आरोपी सासऱ्याने स्वतःच्या कृत्याचा पश्चात्ताप किंवा भीतीने घराच्या पाठीमागे असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी गर्दी केली आणि स्थानिक पोलीस प्रशासनाला याबाबत सूचित केले.

हे ही वाचा : 'आता सगळी मुंबई जाम करायची' आंदोलक थेट काय बोलून गेले?

हत्येचं नेमकं कारण काय?

घटनेचे गांभीर्य ओळखून यशोधरानगर पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे हस्तगत करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे. विहिरीत उडी मारून गंभीर जखमी झालेल्या आरोपी नाथूलालला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. केवळ जादुटोण्याच्या संशयावरून ही हत्या झाली की त्यामागे आणखी काही कौटुंबिक वाद होता, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.