Govt Jobs : इस्रोमधील नोकरीची ही संधी सोडू नका, कसा कराल अर्ज?
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या 'इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्स' (IPRC) मार्फत विविध पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी अर्ज कसा करावा, शैक्षणिक पात्रता काय जाणून घ्या सविस्तर.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
इस्रोमध्ये विविध पदांसाठी भरती
अर्ज कसा करावा?
पगार किती मिळणार?
ISRO Recruitment : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) अंतर्गत येणाऱ्या महेंद्रगिरी (तिरुनेलवेली, तमिळनाडू) येथील 'इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्स' (IPRC) मार्फत विविध पदभरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार एकूण 22 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. अंतराळ संशोधन क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
'या' पदासांठी भरती
या भरती प्रक्रियेअंतर्गत तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant), तंत्रज्ञ 'बी' (Technician ‘B’), आचारी 'अ' (Cook ‘A’) आणि अग्निशामक 'अ' (Fireman ‘A’) या विविध पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये तांत्रिक सहाय्यक पदासाठी ऑटोमोबाईल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन या विभागांचा समावेश आहे. तंत्रज्ञ 'बी' या पदासाठी टर्नर, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन अँड एसी तसेच इलेक्ट्रिशियन या विविध ट्रेड्समधील उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
हे ही वाचा : कुणबी प्रमाणपत्र कसं मिळवायचं? सरकारने कशी बदलली रणनीती?
शैक्षणिक पात्रता
या सर्व पदांसाठी स्वतंत्र शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. तांत्रिक सहाय्यक पदासाठी संबंधित शाखेतील प्रथम श्रेणीतील अभियांत्रिकी डिप्लोमा आवश्यक आहे. तंत्रज्ञ 'बी' पदासाठी 10 वी उत्तीर्णसह संबंधित ट्रेडमधील आयटीआय (NCVT कडून NTC किंवा NAC प्रमाणपत्र) पूर्ण असणे गरजेचे आहे. कूक 'अ' पदासाठी 10 वी उत्तीर्णसह नामांकित हॉटेल किंवा कँटीनमधील 5 वर्षांचा स्वयंपाकाचा अनुभव अनिवार्य आहे, तर फायरमन 'अ' पदासाठी 10 वी उत्तीर्णसोबतच विहित शारीरिक पात्रता आणि प्राथमिक वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
हे ही वाचा : 'आता सगळी मुंबई जाम करायची' आंदोलक थेट काय बोलून गेले?
वेतन किती मिळणार?
निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार आकर्षक वेतनश्रेणी मिळणार आहे. यात तांत्रिक सहाय्यक पदासाठी पे लेव्हल 7 नुसार 44,900 ते 1,42,400 तंत्रज्ञ 'बी' पदासाठी पे लेव्हल 3 नुसार 21,700 ते 69,100 तर कूक 'अ' आणि फायरमन 'अ' या पदांसाठी पे लेव्हल 2 नुसार 19,900 ते 63,200 या श्रेणीत वेतन दिले जाईल. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबर पासून सुरू होत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर आहे. इच्छुक उमेदवारांनी आयपीआरसीच्या अधिकृत पोर्टलवरूनच (www.iprc.gov.in) ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
