मुंबईची खबर : सिग्नलचा मनस्ताप दूर होणार, 31 मे पासून 'हा' उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बऱ्याच काळापासून रखडलेल्या 'मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारा'चे काम अखेर पूर्ण झाले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईची खबर : सिग्नलचा मनस्ताप दूर होणार
31 मे पासून 'हा' उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
Mumbai News : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बऱ्याच काळापासून रखडलेल्या 'मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारा'चे काम अखेर पूर्ण झाले आहे. 31 मे रोजी हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. 2019 पासून या उड्डाणपूलाच्या विस्तारीकरणाचे काम सुरु होते. मात्र या प्रकल्पाच्या डिझाईनमध्ये करावे लागलेले बदल आणि ओशीवारा नाल्याच्या पुनर्रचनेमुळे या कामाला विलंब होत होता.
प्रवासाचा वेळ घटणार
हा मूळ उड्डाणपूल 2016 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. यानंतर 2019 मध्ये याच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले. या उड्डाणपुलामुळे गोरेगाव पूर्व येथील पूर्व द्रुतगती महामार्ग (WEH) आणि गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर जंक्शन दरम्यानची कनेक्टिव्हिटी लक्षणीयरीत्या सुधारेल. तसेच या मार्गावरील प्रवासाचा वेळ कमालीचा घटणार असून, 30 मिनिटांचा खडतर प्रवास आता अवघ्या पाच मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.
हे ही वाचा : NCP सोडलेल्या नेत्याची 'त्या' पदावरील नेमणूक रोखा, सूनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
अनेक आव्हानांचा सामना
या विस्तारित प्रकल्पांतर्गत 750 मीटर लांबीचा पूल बांधण्यात आला आहे. यासाठी तब्बल 200.75 कोटी रुपये खर्च झाले आहेत. या प्रकल्पाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले तरीही वीज जोडणीचे अंतिम काम शिल्ल्क आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीकडून ते लवकरच पूर्ण केले जाणार आहे. या प्रकल्पाची वर्क ऑर्डर 2018 मध्ये जारी करण्यात आली होती, परंतु प्रत्यक्ष काम करताना यंत्रणेला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. मात्र अखेरीस हे काम पूर्ण करण्यात आले असून मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
हे ही वाचा : बाप अन् सावत्र आईने अल्पवयीन मुलीसोबत केलं कांड, सगळं गुपचूप उरकलं, पण...
सिग्नलमुक्त प्रवास
हा पूल खुला झाल्यानंतर जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना सिग्नलमुक्त प्रवास करता येणार आहे. यामुळे वाहनचालकांना एस. व्ही. रोडवरील तीन प्रमुख वाहतूक सिग्नलचा मनस्ताप टाळता येईल.









