महाराष्ट्र : मुलांसाठी बाप ड्रेनेजमध्ये उतरला, नेमकं काय घडलं?
Washim News : वाशिममधील मध्यमेश्वर मंदिर परिसरात ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे एका प्लंबरला सांडपाण्यात उतरून साफ-सफाई करावी लागली. नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे नागरिक हतबल होऊन स्वतःच स्वच्छता करण्यास भाग पडत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्र : नगरपालिका दखल घेईना
मुलांच्या आरोग्याच्या चिंता, सफाईसाठी स्वत: नाल्यात उतरला
Washim News, जका खान : वाशिम शहरातून प्रशासन व्यवस्थेचे धिंडवडे काढणारा धक्कादायक प्रकार समोर आलाय. वाशिममधील मध्यमेश्वर मंदिर परिसरातील सौदागारपुरा भागात ड्रेनेज लाईन पूर्णपणे ब्लॉक झाल्यामुळे गलिच्छ पाणी थेट लोकांच्या घरांमध्ये शिरू लागले होते. या गंभीर समस्येबाबत स्थानिकांनी अनेकदा नगरपालिका आणि स्थानिक नगरसेवकांकडे तक्रारी केल्या होत्या, परंतु प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
हेही वाचा : पुणे : IT इंजिनिअर मुलीचे चप्पल विक्रेत्यासोबत प्रेमसंबंध.. शेवटी नदीपात्रात मृतदेह सापडला!
दरम्यान, ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे सैय्यद समीर या प्लंबरच्या घरातही सांडपाणी भरू लागले. समीर यांनी प्रशासनाकडून मदतीची वाट पाहिली, परंतु कोणाकडूनही दखल घेतली गेली नाही. शेवटी, स्वतःच्या मुलांच्या आरोग्याची चिंता आणि घरात वाढणारे पाणी पाहून समीर यांनी स्वतःच जिवाची बाजी लावून गटार साफ करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी चेंबरचे झाकण उघडून थेट गळ्यापर्यंत सांडपाण्यात उतरून पाइपच्या सहाय्याने साचलेली घाण बाहेर काढली.
हेही वाचा : बीड : 15 वर्षीय मुलगी घरात एकटीच, आजोबा अन् चुलत भाऊ राक्षस बनले, भयंकर कांड









