पुणे : IT इंजिनिअर मुलीचे चप्पल विक्रेत्यासोबत प्रेमसंबंध.. शेवटी नदीपात्रात मृतदेह सापडला!

मुंबई तक

Pune Crime News : पुण्यातील एका IT इंजिनिअर मुलीने मुठा नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याचं समोर आलंय. प्रियकराने फसवणूक केल्याने तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याची फिर्याद भावाने दिली आहे.

ADVERTISEMENT

Pune Crime News
Pune Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

पुणे : IT इंजिनिअर मुलीचे चप्पल विक्रेत्यासोबत प्रेमसंबंध...

point

शेवटी नदीपात्रात मृतदेह सापडला!

Pune Crime News : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीये. एका उच्चशिक्षित आयटी इंजिनिअर तरुणीने मुठा नदीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवल्याचं समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, तरुणीने मृत्यूपूर्वी केलेल्या आरोपामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. याप्रकरणी मृत तरुणीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा : सोलापूर : रीलस्टार- हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीणीची आत्महत्या, आता नवऱ्याची पोस्ट व्हायरल

प्रेमसंबंध आणि फसवणुकीचा आरोप

भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार, सदर तरुणीचे एका चप्पल विक्रेत्यासोबत प्रेमसंबंध होते. तरुणीने तीन महिन्यांपूर्वीच आपल्या कुटुंबीयांना या नात्याबद्दल कल्पना दिली होती आणि दोघांचे लग्न होणार असल्याचेही स्पष्ट केले होते. तिची आई देखील या नात्यासाठी सकारात्मक होती आणि तिने नातेवाईकांना लग्नाबद्दल माहिती दिली होती. मात्र, मे महिन्यात तरुणीने आपल्या भावाला मेसेज करत प्रियकराने आपली फसवणूक केल्याचे आणि वापर करून घेतल्याचे सांगितले. प्रियकराने तिला विसरून जाण्यास सांगितल्याने ती मानसिक तणावाखाली होती. या परिस्थितीवर भावाने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रेमात आंधळी झालेली तरुणी आपल्या निर्णयावर ठाम होती.

हेही वाचा : बीड : सावत्र आई आणि मुलाच्या प्रेमसंबंधांचा थरारक शेवट, नेमकं काय घडलं?

हे वाचलं का?