सोलापूर : रीलस्टार- हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीणीची आत्महत्या, आता नवऱ्याची पोस्ट व्हायरल
Solapur Crime : लोकप्रिय रीलस्टार रोहिणी पाराध्ये यांनी मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे स्वत:च्या हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या निधनामुळे सोशल मीडिया विश्वात मोठी खळबळ उडाली असून, पती निलेश पाराध्ये यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोलापूर : रीलस्टार- हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीणीची आत्महत्या
आता नवऱ्याची पोस्ट व्हायरल
Solapur Crime : सोशल मीडियाच्या जगात रील्स बनवून अल्पावधीत लोकप्रियता मिळवणाऱ्या रीलस्टार रोहिणी निलेश पाराध्ये (वय 25) यांनी बुधवारी (दि.27) दुपारी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. सोलापूर (Solapur Crime) जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का दिला आहे. रोहिणी आणि त्यांचे पती निलेश पाराध्ये हे सोशल मीडियावर सक्रिय होते. हॉटेलच्या रील्समुळे जिल्ह्यातील हजारो नेटिझन्सच्या मनात स्थान मिळवले होते. याच लोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत “हॉटेल ग्रामपंचायत” हा व्यवसाय यशस्वीपणे सुरू केला होता. मात्र, हसत-खेळत सुरु असलेला संसार आणि भरभराटीला आलेला व्यवसाय सोडून रोहिणी (reels star rohini paradhye) यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयाने सोशल मीडिया विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय, पण गावाकडे जीव गेला
हॉटेलच्या स्वयंपाकघरात केली आत्महत्या
ब्रह्मपुरी येथील “हॉटेल ग्रामपंचायत”च्या स्वयंपाकघरात मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास रोहिणी यांनी पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले. ही घटना उघडकीस आल्यानंतर पती निलेश यांनी त्यांना तातडीने मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासणीअंती मृत घोषित केले. या प्रकरणी पती निलेश पाराध्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात रीतसर खबर नोंदवण्यात आली आहे. रोहिणी यांनी आत्महत्या का केली, यामागील नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात असून पोलीस प्रशासनाकडून सखोल तपास केला जात आहे. व्यवसाय चांगला स्थिरावत असताना रोहिणी यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले, या प्रश्नाने नातेवाईक आणि चाहत्यांनाही संभ्रमात टाकले आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात 12 तास धोक्याचे! पाऊस धिंगाणा घालणार, 14 जिल्ह्यांना अलर्ट









