Gen Z चं आंदोलन BJP ला न सुटलेलं कोडं... सरकारचे 'चाणक्य' चुकले तरी कुठे?

रोहित गोळे

भाजपची 'चाणक्यनीती' अनेक राजकीय लढायांमध्ये यशस्वी ठरली. मात्र विद्यार्थ्यांच्या एकजुटीसमोर ही रणनीती का निष्प्रभ ठरली? याचबाबत जाणून घ्या या आंदोलनामागचं राजकीय विश्लेषण.

ADVERTISEMENT

gen z protest a puzzle bjp couldnt solve where exactly did governments chanakya go wrong
सरकारचे 'चाणक्य' चुकले तरी कुठे? (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: चॅटजीपीटी)
Google CTA

नवी दिल्ली: देशाच्या राजकारणात गेल्या बारा वर्षांत भाजपची 'चाणक्यनीती' अनेकदा यशस्वी ठरली पण यावेळी समोर विरोधी पक्ष नव्हता समोर होती विद्यार्थ्यांची एकजूट. मग असा प्रश्न पडतो विद्यार्थ्यांच्या फोर्ससमोर भाजपची चाणक्यनीती का चालली नाही?

विरोधकांचा आमदार फोडायचा असेल, सरकार वाचवायचं असेल, निवडणूक जिंकायची असेल किंवा एखादं आंदोलन थंड करायचं असेल तेव्हा अनेक जण म्हणतात थांबा.. अजून मोदी-शाहांची चाल बाकी आहे.

कारण गेल्या अनेक वर्षांत देशाने एक पॅटर्न पाहिला आहे. विरोधकांनी घोषणा दिल्या, रस्त्यावर आंदोलन केलं, टीव्हीवर आरडाओरडा झाला आणि शेवटी राजकीय चेकमेट मोदी-शाहांनीच दिला.

चाणक्य नीतीला शह देणारे नवे खेळाडू 

पण यावेळी पहिल्यांदाच प्रश्न विचारला जातोय चाणक्य नीतीला शह देणारे नवे खेळाडू आहेत तरी कोण?