पुणे : IT कर्मचाऱ्याला कारने चिरडलं, FIR मध्ये आरोपीचं नाव नाही? नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

Pune Accident News : पुण्यातील पाषाण भागात भरधाव इनोवा कारने आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या वीरेंद्र द्विवेदी यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला असून एफआयआर आणि पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ADVERTISEMENT

Pune Accident News
Pune Accident News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पुणे : IT कर्मचाऱ्याला कारने चिरडलं

point

FIR मध्ये आरोपीचं नाव नाही? नेमकं प्रकरण काय?

Pune Accident News : पुण्यातील पाषाण भागात भरधाव कारने आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या वीरेंद्र द्विवेदी यांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. पाषाण ते विद्यापीठाला जोडणाऱ्या नेकलेस रोडवर सकाळी सुमारे सात वाजता हा अपघात झाला. द्विवेदी हे रस्त्याने चालत जात असताना किंवा रस्ता ओलांडण्यासाठी गेले असताना मागून आलेल्या काळ्या रंगाच्या टोयोटा इनोव्हा कारने त्यांना धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. या धडकेत त्यांच्या डोक्याला मार लागला आणि नाकातून रक्त आले. त्यानंतर त्यांना कारमध्ये टाकून बावधन परिसरातील चेराराम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू घटनास्थळीच झाल्याचे स्पष्ट केले. अपघाताच्या ठिकाणी वॉचमन आणि इतर लोकही उपस्थित होते.

हेही वाचा : Maharashtra Weather : गणेशोत्सवाच्या आगमनादिवशी वरुणराजाची दमदार हजेरी, IMD चा अलर्ट

वेगमर्यादा पाळली गेली होती का? 

अपघात झाल्यानंतर संबंधित कारचा क्रमांक एमए 12 वायएस 0622 असल्याची माहिती समोर आली. या क्रमांकाच्या वाहनाचा मालक ब्लू रेस डेव्हलपर्स एलएलपी असल्याचे समोर येत आहे. वाहनाच्या कागदपत्रांमध्ये टू रेंज हिल कॉर्नर, गणेश खिंड रोड, पुणे सिटी, पुणे असा पत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे. पाषाणचा हा रस्ता रहदारीचा असून या मार्गावर सकाळच्या वेळी सायकलिंग, जॉगिंग आणि चालण्यासाठी येणारे नागरिकही असतात. या परिसरात विविध संस्था आणि प्रयोगशाळा आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. अपघाताच्या वेळी कारचा वेग किती होता, याबाबत प्रश्न उपस्थित होत असून या ठिकाणी वेगमर्यादा पाळली गेली होती का, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : पोलिसांनी मुंबईतील आंदोलनाची परवानगी नाकारली, आता मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया