बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करण्याचा शुभमुहूर्त कधी? संपूर्ण माहिती वाचा
Ganesh Idol Sthapana : हिंदू धर्मात गणरायाचे पहिले पूजन केले जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात ही गणपती बप्पाच्या पूजेनं केली जाते. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात गणेश चतुर्थी साजरी गेली जाते. आज 14 सप्टेंबर दिवशी गणपती बप्पाच्या मूर्तीची पूजा केली जाते. अशातच गणपती बप्पाच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त, पूजा, विधी याची माहिती पुढे दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गणरायाची पूजा कधी करावी?
गणरायाला काय अर्पण करावे?
Ganesh Idol Sthapana : हिंदू धर्मात गणरायाचे पहिले पूजन केले जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात ही गणपती बप्पाच्या पूजेनं केली जाते. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात गणेश चतुर्थी साजरी गेली जाते. आज 14 सप्टेंबर दिवशी गणपती बप्पाच्या मूर्तीची पूजा केली जाते. अशातच गणपती बप्पाच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त, पूजा, विधी प्रिय भोग आणि आरतीशी संबंधित माहिती दिली आहे.
हे ही वाचा : Maharashtra Weather : गणेशोत्सवाच्या आगमनादिवशी वरुणराजाची दमदार हजेरी, IMD चा अलर्ट
गणरायाची पूजा कधी करावी?
चतुर्थी तिथीला गणपतीची पूजा करणे शुभ मानले जाते. विशेषतः दुपारी गणपतीची स्थापना करून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. गणेश मूर्तीची स्थापना आणि पूजेसाठी सकाळी 11: 02 ते दुपारी 1:31 पर्यंतचा शुभ मुहूर्त असेल.
भाविकांनी गणेश चतुर्धी दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. यानंतर, आपल्या घरातील पूजास्थळ पूर्णपणे स्वच्छ करून ठेवावे. तुम्ही गणेशाची स्थापना करणार आहात, तिथे एक आसन ठेवा. स्वच्छ ओट्यावर लाल किंवा पिवळे कापड अंथरा, नंतर ओट्यावर तांदूळ दाणे ठेवा आणि गणरायाची मूर्ती स्थापना करा.
मूर्तीजवळ तांब्याचे किंवा पितळेचे भांडे ठेवा. त्यात पाणी, गंगाजल, सुपारी, पैशांचा एक नाणे आणि तांदळ भरावे. आंब्याच्या पानांनी भांड्यावर एक नारळ ठेवावा. गणेशाची मूर्ती एका चौथाऱ्यावर ठेवावे. मूर्तीची स्थापना करताना, हातात तांदळाचे दाणे आणि फुले घेऊन गणपतीचे ध्यान करा. त्यानंतर, 'ॐ गण गणपतये नमः' या मंत्राचा जप करून गणपतीचे आवाहन करा.
