Maharashtra Weather : राज्यात 12 तास धोक्याचे! पाऊस धिंगाणा घालणार, 14 जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात सध्या मान्सूनपूर्वी वातावरणाने उष्णता आणि पावसाचा दुहेरी प्रभाव पाहायला मिळत आहे. अशातच कोकण विभागातील 4 जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला, जाणून घ्या एकूण हवामानाचा अंदाज.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात उष्णता आणि पावसाचा दुहेरी प्रभाव

point

एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे...

Maharashtra Weather : राज्यात सध्या मान्सूनपूर्वी वातावरणाने उष्णता आणि पावसाचा दुहेरी प्रभाव पाहायला मिळत आहे. अशातच कोकण विभागातील 4 जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट वर्तवला आहे. अशातच 28 मे 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे दर्शवण्यात आला. 

हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : देशातील सर्वाधिक लांब उड्डाणपूल पुण्याला जोडणार, वाहतूक कोंडी सुटणार

कोकण 

कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या चार जिल्ह्यांत उष्णतेचा यलो अलर्टचा अंदाज करण्यात आला आहे. वाढत्या तापमानाने नागरिकांना उष्माघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यांत काही भागांत ढगांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. दुपारनंतर वातावरणात बदल काही भागांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. 

मराठवाडा 

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, आणि बीड जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला. याच भागात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटाचा अंदाज वर्तवण्यात आला. 

हे वाचलं का?